नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीकडे वाईट नजरेने बघितल्‍याच्‍या कारणावरून भावाने वॉचमनची हत्या केली आहे. सतलाल मुकूरी प्रसाद (४०, रा. नाहर छापला पडरोना, कुशीनगर, उत्तर प्रदेश) असं हत्या करण्यात आलेल्या वॉचमनचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील म्हसरूळ येथील वाढणे कॉलनीतील हनुमान मंदिराजवळ एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी संशयित योगेश पंढरीनाथ डंबाळे (२७, रा. ननाशी) बिगारी म्हणून काम करत होता. या साइटवर सतलाल मुकूरी प्रसाद हा वॉचमन म्हणून काम करत होता. गुरुवारी रात्रीच्या वेळी बिगारी योगेश डंबाळे हा दारू पिऊन आला आणि त्याने सतलाल याला माझ्या बहिणीकडे वाईट नजरेने का बघतो, असा सवाल करत सतलालच्या गालावर जोरदार चापट मारली. यावेळी दोघांमध्ये झालेल्या वादात वॉचमन सतलाल प्रसाद हा खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सतलाल हा मृत अवस्थेत आढळून आला.

सुषमा अंधारेंच्या प्रकृतीबद्दल उलट-सुलट चर्चा; अखेर संपर्कप्रमुख संजय सावंतांनी दिली नेमकी माहिती

वॉचमनचा मृत्यू झाल्याने म्हसरूळ पोलीस ठाण्यात योगेश डंबाळे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, नाशिकमध्ये म्हसरूळ परिसरातीलच मेरी शासकीय वसाहतीत २ हजार रुपये दिले नाही म्हणून काकानेच पुतण्याची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक हत्या झाली आहे. या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here