मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. तर बोरिवली ते भाईंदरदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असल्याने पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही. ब्लॉक वेळेत रेल्वेरुळांची, सिग्नल, ओव्हरहेड वायर यांची देखभाल दुरुस्ती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते. यामुळे रविवारी काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहे.

मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)

स्थानक – सीएसएमटी ते विद्याविहार

मार्ग – अप आणि डाऊन धीमा

वेळ – सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५

परिणाम – ब्लॉक वेळेत अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप-डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल गाड्या रद्द राहणार असून काही फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

निवृत्तीवेतन योजना वैध; आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
हार्बर रेल्वे

स्थानक – पनवेल ते वाशी

मार्ग – अप आणि डाऊन

वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५

परिणाम – ब्लॉक वेळेत सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर आणि पनवेल-ठाणे दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन फेऱ्या रद्द राहणार आहेत. या कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि खारकोपर, ठाणे-वाशी/नेरूळ आणि मुंबई-वाशी दरम्यान लोकल फेऱ्या धावणार आहेत.

पश्चिम रेल्वे

स्थानक – बोरिवली ते भाईंदर

मार्ग – अप आणि डाऊन धीमा

वेळ – रात्री १२.३५ ते पहाटे ४.३५ (शनिवार-रविवार मध्यरात्र)

परिणाम – ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील वाहतूक विरार/वसई रोड ते बोरिवली/गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहे.

डासांची गुणगुण…कैद्याची भुणभुण! मच्छरदाणी हवी म्हणत न्यायालयात आणली डासांनी भरलेली बाटली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here