मुंबई : ट्विटरचे (Twitter) नवे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी भारतातील कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीचे भारतात जवळपास २५० कर्मचारी होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटिंग, कम्युनिकेशन आणि इतर काही विभागात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.

ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकणं इतकं सोपं नाही! एलन मस्क पुन्हा अडचणीत येणार..
सीईओंची हकालपट्टी
जागतिक स्तरावर कर्मचार्‍यांची संख्या कमी करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून ट्विटरने भारतातील कर्मचार्‍यांना काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. मस्क यांनी गेल्या आठवड्यात ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पराग अग्रवाल, मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) आणि इतर काही उच्च अधिकाऱ्यांना काढून टाकले. त्यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर लगेचच त्यांची हकालपट्टी केली. यानंतर उच्च व्यवस्थापनातील अनेकांनी राजीनामे दिले.

Twitter Layoff: ट्विटर कर्मचाऱ्यांची चिंता वाढली, Elon Musk यांचा एक ई-मेल आला आणि…
३,७०० कर्मचाऱ्यांना काढण्याची योजना
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ट्विटरचे मालक झाल्यानंतर कंपनीतील सुमारे ३,७०० कर्मचाऱ्यांना एका झटक्यात काढून टाकण्याची योजना आखली आहे. तत्पूर्वी, कंपनीने कर्मचाऱ्यांना मेल पाठवून सांगितले की शुक्रवारी कामावरून कमी केले जाईल. शुक्रवारी सकाळी जेव्हा ट्विटरचे कर्मचारी जागे झाले तेव्हा त्यांना कंपनीकडून एक मेल आला. या मेलमध्ये लिहिले की, तुम्ही आज ऑफिसला येण्याचा विचार करत असाल तर आधी तुमची नोकरी वाचली आहे की नाही ते तपासा. तसेच ई मेलमध्ये लिहिले आहे की त्यांची सर्व कार्यालये देखील बंद करण्यात आली आहेत आणि बॅज प्रवेश निलंबित करण्यात आला आहे.

शेअर बाजार इम्पॅक्ट; जगातील अब्जाधीशांनी एका दिवसात ३३ अब्ज डॉलर गमावले, एलन मस्कना कोटींचा घाटा
४४ अब्ज डाॅलरमध्ये करार
एलन मस्कने सूचित केले होते की, ते ट्विटरच्या अर्ध्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार करत आहेत. मस्क अशाप्रकारे आपल्या कंपनीतून कर्मचारी काढून टाकतील, असे कोणालाच वाटले नव्हते. मस्क यांनी या वर्षी ट्विटरला ४४ अब्ज डाॅलरमध्ये विकत घेण्याचा करार केला होता. परंतु अनेक चढ-उतारांनंतर ट्विटरचा करार नुकताच पूर्ण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here