पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी सुरक्षा रक्षक आणि डॉक्टरांच्या मदतीने अर्भकाला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक वैद्यकीय तपासात हे स्त्री जातीचे अर्भक असून ते मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तपासादरम्यान हे अर्भक सर्वोपचार रुग्णालयातीलच असल्याचे समोर आले. एनआयसीयुमध्ये काल शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह मुलीचे वडील ज्ञानेश्वर डोरळे याच्याकडे सोपविला. मात्र, अंत्यसंस्कार न करताच जन्मदात्या ज्ञानेश्वर डोरळे याने तिला रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात फेकून दिले.
तासाभरातच अर्भक फेकून देणारा बाप समोर…
मृत अर्भकाला अपघात कक्षात आणल्यानंतर हे अर्भक सर्वोपचार रुग्णालयातीलच असल्याचा संशय डॉक्टरांना आला. डॉक्टरांनी मुलीचा मृतदेह तिच्या पित्याकडे सोपविला होता. वैद्यकीय दस्ताऐवजाच्या मदतीने मुलीच्या पित्याचा मोबाईल क्रमांक डॉक्टरांना मिळाला. दरम्यान येथील एका कर्मचाऱ्याने मुलीचा पिता ज्ञानेश्वरला फोन करून संपर्क साधला. मृत मुलगी त्याचीच असल्याची त्याच्याकडून खात्री करून घेतली. तासाभरातच पोलिसांनी ज्ञानेश्वर याला रुग्णालय परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांसमोर मांडला. त्यानंतर पोलिसांनी मृत अर्भक बापाच्या ताब्यात देवून त्याला सोडून देण्यात आले. ज्ञानेश्वरकडे तिच्या मृत्यूचं सर्टिफिकेट असल्याने त्याच्यावर कुठलीही कारवाई करू शकले नाहीl. दरम्यान, चिमुकलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मृत अर्भकाला जन्मत:च नव्हती अन्ननलिका…
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बेलारा येथील रहिवासी मुक्ता ज्ञानेश्वर डोरळे यांची १ नोव्हेंबरला प्रसुती झाली. मुलगी जन्माला आली पण तिला जन्मत:च अन्ननलिका नसल्याने एनआयसीयुमध्ये तिच्यावर उपचार सुरू होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर डॉक्टरांनी चिमुकलीचा मृतदेह मुलीचा पिता ज्ञानेश्वर डोरळे याच्याकडे सोपविला होता.
The paper has excellent writing, fantastic material, and a sensitive map of dispersion. monkey mart