Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by सचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 5 Nov 2022, 1:38 pm

Nitin Gadkari : वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबसह इतर प्रकल्पांवरून शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे राज्यातील शिंदे-भाजप सरकारवर गंभीर आरोप केले. या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ठोस प्रत्युत्तर दिलं. यानंतर आदित्य ठाकरेंनीही पत्रकार परिषदेतून फडणवीसांना उत्तर दिलं. आता या वादावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

 

nitin gadkari on adtiya thackeray
वेदांता फॉक्सकॉनवरील आरोपांवरून गडकरींचा आदित्य ठाकरेंना टोला, ‘कारण नसतानाही लोक….’
मुंबई : वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबससारखे लाखो कोटींचे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातल गेल्याने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार टीका होत आहे. विरोधी पक्षांकडून शिवसेना ( Aditya Thackeray ), राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. यावरून राजकारण तापलं असताना आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी या वादात उडी घेतली आहे. मुंबईत ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’मध्ये शुक्रवारी गडकरींना बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी नितीन गडकरी यांनी या वादावर भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रात भाजपची सत्ता असतानाही वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबससारखे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला का गेले? असा प्रश्न गडकरींना इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये विचारण्यात आला. त्यावर गडकरींनी थेट आणि स्पष्ट उत्तर दिलं. देशात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सर्वात वेगवान आहे. नागपूरला आमच्याकडे टालचा (TAAL) प्रकल्प आहे. या प्रकल्पात एअरबस आणि बोईंच्या विमानांसाठी सुटे भाग बनवले जातात. तिथे आता राफेल आणि फाल्कन विमानेही बनवली जाणार आहेत. उद्योगधंदे अनेक ठिकाणी जातात. पण आपला उद्योग कुठे स्थापन करायचा? याचा निर्णय गुंतवणूकदारांच्या हातात असतो. हे राज्याच्या हातात नसते, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात वाहन उद्योगातील कंपन्यात आहेत. पुण्यात वाहननिर्मिती करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्या आहेत. महाराष्ट्राच्या सर्वच भागांमध्ये उद्योगधंदे सुरू आहेत. आधी विदर्भ, मराठवाडा मागसलेला असा वाद आणि आरोप व्हायचे. पण आता तसं नाहीए. सर्व भागांचा विकास होतोय, असं गडकरी बोलले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here