सीडनी : श्रीलंकेनं दिलेलं १४२ धावांचं आव्हान इंग्लंडनं ४ विकेटस राखून पार केलं. इंग्लंडसाठी आजचा सामना महत्त्वाचा होता. इंग्लंडनं श्रीलंकेला पराभूत केल्यानं त्यांचा उपात्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला आहे. तर, वर्ल्डकप विजेता ऑस्ट्रेलिया संघ मात्र स्पर्धेबाहेर गेला आहे. श्रीलंकेकडून पथुम निसांका यानं ६७ धावा केल्या मात्र त्याला इतर खेळाडूंची साथ न मिळाल्यानं श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
बातमी अपडेट होत आहे…