नवी दिल्ली: ट्विटरच्या भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. एलन मस्कने ट्विटरच्या जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात सुमारे ७५०० ट्विटर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

काढून टाकण्यात आलेल्यांमध्ये एक ८ महिन्यांची गर्भवती महिला देखील आहे. ट्विटरच्या कंटेंट मार्केटिंग मॅनेजर रॅचेल बॉन यांनी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सांगितले की गुरुवारी संध्याकाळी तिच्या लॅपटॉपवरील एक्सेस काढून टाकण्यात आला. त्याच संध्याकाळी, सर्व कर्मचार्‍यांना एका मेलद्वारे क्रॉसकटिंगबाबत माहिती देण्यात आली.

हेही वाचा-रोहित शर्माने झिम्बाब्वेविरुद्ध संधी दिली नाही, तर या खेळाडूचं करिअर संपलं समजा; संधी देऊनही फ्लॉप होतोय!

‘आज एसएफ ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. मी ८ महिन्यांची गर्भवती आहे आणि मला ९ महिन्यांचं बाळ आहे. माझा लॅपटॉप ऍक्सेस काढण्यात आला आहे’, असं रॅचेल बॉन म्हणाली.

rachel bon

कुशीत ९ महिन्यांचं बाळ, ८ महिन्यांची गर्भवती असाताना Twitter ने नोकरीवरुन काढलं

कंपनीने म्हटले आहे की ती पुन्हा एकदा योग्य मार्गावर येण्यासाठी एक कठीण काम करत आहे. कंपनी आपले जागतिक कर्मचारी कमी करण्याच्या प्रक्रियेत आहे. या अंतर्गत कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी तसेच ट्विटर सिस्टीम आणि यूजर डेटासाठी सर्व कार्यालये तात्पुरती बंद करण्यात येत आहेत. लोकांना कार्यालयातून घरी परत पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा-Elon Musk Love Stories: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा रोमँटिक अंदाज, ५ महिलांशी नातं, जॉनी डेपच्या एक्स पत्नीसोबतही होतं अफेअर

कंपनीने भारतीय कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यापूर्वी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही काढून टाकण्यात आले आहे. ट्विटरचे भारतात ३०० कर्मचारी आहेत. अशा स्थितीत एलन मस्क आता काय करणार हे खूप मनोरंजक असेल.

सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है; जळगावात ठाकरे गटाच्या घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here