लॉटरीची माहिती देण्यासाठी शोचे होस्ट रिचर्डने सजेशला फोन केला तेव्हा त्याला वाटले की कोणीतरी मस्करी करत आहे. सजेश म्हणाला, ‘मला वाटले की कोणीतरी मला प्रँक करण्यासाठी बोलावले आहे. पण जेव्हा मला एकाच नंबरवरून अनेक कॉल्स आले, तेव्हा आम्ही ऑनलाइन तपासले. त्यानंतर विजयी क्रमांक आमचाच असल्याचे आढळले. जॅकपॉट जिंकणे हा क्षण आमच्यासाठी विसरता येणार नाही, असे या गटातील प्रवीण अँटोनी यांनी सांगितले.
मी जिंकत नसल्याने टीव्ही पाहणे बंद केले होते
अँटनी म्हणाले, ‘आम्ही नेहमी त्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या अपेक्षेने पाहायचो. पण जेव्हा आम्ही खरोखर जिंकलो तेव्हा आम्ही ते पाहतच नव्हतो. आम्हाला जिंकण्याची अपेक्षा नव्हती. आमचे तिकीट क्रमांक कधीकधी विजेत्यांसोबत जुळायचे. आम्ही अनेक वेळा विजेत्या क्रमांकाच्या खूप जवळ आलो आहोत, पण जिंकू शकलो नाही. म्हणूनच आम्ही ते पाहणे बंद केले. शो संपल्यावर आम्हाला वेबसाईट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विजेत्यांबाबत माहिती मिळत असते.
‘आम्ही रात्रभर झोपू शकलो नाही’
हे सर्व लोक रातोरात करोडपती झाले असले, तरी देखील शुक्रवारी ते सर्व पुन्हा आपल्या कामावर परतले. अँटनी म्हणाले, ‘आज आम्ही तासाभरापूर्वी आलो, कारण कोणीही नीट झोपले नव्हते. एवढं मोठं पारितोषिक जिंकण्याचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता. हे पूर्णपणे अनपेक्षित होते.’ गुरुवारी संध्याकाळी होणारा कार्यक्रम ‘बिग’ तिकिटचा २०२० नंतरचा पहिला आऊटडोअर ड्रॉ होता. पुढील ड्रॉ ३ डिसेंबर रोजी होईल. या ड्रॉची किंमत ३ कोटी दिरहम इतकी आहे. दुसरे बक्षीस १० लाख दिरहम, तिसरे बक्षीस १ लाख दिरहम आणि चौथे बक्षीस ५० हजार दिरहम इतके आहे.