Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना सल्ला देत त्यांनी जाती अंताचे आंदोलन केले पाहिजे, जो पर्यंत जातीचा अंत होत नाही तो पर्यंत भारत जोडला जाणार नाही हे लक्षात घ्यायला हवं असे ते म्हणाले.

 

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर

हायलाइट्स:

  • प्रकाश आंबेडकरांची टीका
  • काँग्रेसवर टीकास्त्र
  • भारत तुटलाच नसल्याचं वक्तव्य
नांदेड : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे. यात्रा संपली की बुडबुडा फुटणार असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. ते नांदेड येथे आयोजित धम्म मेळाव्यात बोलत होते.भारत जोडण्याचा मुद्दाच येत नाही. तुटला असेल तर जोडण्याचा विषय येतो.खऱ्या अर्थाने भारत जोडायचा असेल तर भारतामधली हजारो वर्षाची गुलामगिरी संपवायला हवी, जाती अंताचे आंदोलन केले पाहिजे, जो पर्यंत जातीचा अंत होत नाही तो पर्यंत भारत जोडला जाणार नाही हे राहुल गांधीनी लक्षात घ्यायला हवं असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राहुल गांधी यांना प्रकाश आंबेडकर यांनी प्रेमाचा सल्ला देखील दिला आहे.भारत जोडो यात्रा काढत आहात.त्याबद्दल विश्वास निर्माण केलात त्याबद्दल आपलं दुमत नाही.पण ही भारत जोडो यात्रा म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे.यात्रा आहे तो पर्यंत हा बुडबुडा आहे.यात्रा संपली की हा बुडबुडा फुटणार आहे.मग पुन्हा सुब्रमण्यम स्वामी लोकांना दिसणार असा टोला देखील अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या धम्म मेळाव्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना लगावला आहे.

विधानसभेतील १६ आमदार बरखास्त झाले असून नांदेडकर आणि लातूरकर हे दोघे देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर जाऊन बसायला तयार असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here