वाचा:
सचिन पायलट यांनी बंड करून राजस्थानातील काँग्रेस सरकारला हादरा दिल्यानंतर महाराष्ट्रातील सरकारच्या भवितव्याबाबत वावड्या उठू लागल्या आहेत. राज्यातील सरकार दोन महिन्यात कोसळेल, अंतर्विरोधानं कोसळेल, अशी वक्तव्ये भाजप नेते करत आहेत. महाविकास आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चेलाही हवा दिली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्यांशी बोलताना यशोमती ठाकूर यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.
वाचा:
‘भाजपनं आपला घाणेरडा खेळ आणि घाणेरडं राजकारण सुरूच ठेवलंय. शेणातला किडा जसा शेणात राहतो तशी भाजपची अवस्था झालीय. केंद्रात यांना एवढी मोठी सत्ता मिळाली तरी त्यांची राज्यातील सत्तेची हाव जात नाही. राज्या-राज्यांतील विरोधकांची सरकारं अस्थिर करण्याचे, फोडाफोडी करण्याचे त्यांचे उद्योग सुरूच आहेत. पण महाराष्ट्रात असं काही होणार नाही. महाराष्ट्रातील सरकार स्थिर आहे. महाराष्ट्रानं नवा फॉर्मुला देशापुढं ठेवला आहे आणि हा फॉर्मुला चालणार आहे,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे आमदार नाराज असल्याच्या भाजपच्या दाव्याचीही यशोमती ठाकूर यांनी खिल्ली उडवली. ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ज्यांना घेऊन सध्या फिरताहेत, ते सगळे बाहेरून आलेले लोक आहेत. खरंतर यांचा पक्ष अत्यंत कमकुवत झाला आहे. यांच्या १०५ आमदारांपैकी बहुतेक लोक आमच्याकडून गेलेले आहेत. ते कधी आमच्याकडं येतील याची गॅरंटी भाजपही देऊ शकत नाही. खरंतर त्यातले अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नाव समजली तर राजकीय भूकंप होईल,’ असंही ठाकूर म्हणाल्या.
वाचा:
आता टेलिग्रामवरही आहे. लेटेस्ट बातम्या आता मोबाइलवरही मिळवा. फॉलो करण्यासाठी
.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times