‘आमदार फुटू नयेत यासाठीच…’
उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांना निडवणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, ‘आमदार फुटू नयेत म्हणून उद्धव ठाकरे हे मध्यावधीची भाषा बोलत आहेत. ‘स्वत:च्या पक्षातून गेलेल्या लोकांचा आरोप काय आहे, त्यावर उद्धव ठाकरे काय बोलले आहेत का’, असा सवालही शेलार यांनी केला आहे. शेलार पुढे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांची सत्ता असतानाच त्यांचे स्वत:चे मंत्री, आमदार, सदस्य पक्ष सोडून गेले. सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे होत्या, तुम्ही मुख्यमंत्री होतात, तरी हे सर्व लोक गेले. त्यांनी मतदानही तुमच्याविरोधात केले. शिवसेना दुबळी केली जातेय, बाळासाहेबांच्या विचारांपासून भरकटतेय, राष्ट्रवादी आमच्याशी राजकारण करत असल्याचे या सर्व लोकांचे म्हणणे होते. या सर्व प्रश्नांना बगल द्यायची आणि भावनात्मक मुद्द्यांवर उरलेल्या शिवसैनिकांना टिकवण्यासाठी गद्दारीचं गाजर द्यायचे’, असा टोलाही त्यांनी लगावला.
Home Maharashtra shivsena uddhav thackeray, पंतप्रधान मोदींची एक कृती आणि उद्धव ठाकरेंनी थेट मध्यावधी...
shivsena uddhav thackeray, पंतप्रधान मोदींची एक कृती आणि उद्धव ठाकरेंनी थेट मध्यावधी निवडणुकांचा अंदाज बांधला; नेमकं काय घडलं? – mid term elections will be held in maharashtra says shivsena chief uddhav thackeray
मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचे भाकीत वर्तवतानाच पक्षाच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी प्रकल्पांच्या घोषणा केल्या आहेत, याचाच अर्थ राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात’, असे त्यांनी सांगितल्याचे समजते.