pune news today in marathi, पुणे हादरलं! वास्तुशास्त्र सल्लागाराच्या खूनानंतर १७व्या दिवशी गूढ उलगडलं, आधी कॉफी पाजली नंतर… – body of the architectural consultant was found on the seventeenth day after the murder pune news
पुणे : बिबवेवाडीतील वास्तुशास्त्र सल्लागाराचे अपहरण करून त्याचा खून झाल्या नंतर निरा नदीत शोध मोहीम राबवित अली होती. १७ दिवसांनी वास्तुशास्त्र सल्लागाराचा मृतदेह शोधून काढला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीसांनी दोघांना अटक केली होती. खूनानंतर आरोपींनी मृतदेह निरा नदीत फेकून दिला होता.
निलेश वरघडे (वय ४३, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या वास्तूशास्त्र सल्लागाराचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी वरघडे यांचा मित्र दीपक जयकुमार नरळे (रा. नर्हे, आंबेगाव), साथीदार रणजीत ज्ञानदेव जगदाळे (वय २९) यांना अटक केली आहे. याबाबत रुपाली रुपेश वरघडे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. निलेश वरघडे वास्तूशास्त्र सल्लागार होते. Naseem Khan: काँग्रेस नेते नसीम खान यांच्या गाडीचा अपघात, कारचं बोनेट चक्काचूर आरोपी निलेश यांच्या परिचयाचे होते. दोघांनी निलेश यांना कॉफीतून गुंगीचे ओैषध दिले. बेशुद्ध पडल्यानंतर निलेश यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी निलेश यांचा मृतदेह पोत्यात भरून नीरा नदीत टाकून देऊन आरोपी पसार झाले होते. तांत्रिक तपासावरून पोलिसांनी आरोपींना अटक केली. मात्र, मृतदेह आढळून आला नाही. आरोपींना अटक केल्यापासून पोलिसांकडून निरा नदीत मृतदेहाचा शोध घेतला जात होता.
पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्स, भोईराज आपत्ती संघ, महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन संघाच्या मदतीने अखेर सतराव्या दिवशी वरघडे यांचा मृतदेह शोधून काढण्यात यश आले. बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक संजय आदलिंग, विवेक सिसाळ, हवालदार शाम लोहोमकर, सतीश मोरे, तानाजी सागर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.