Maharashtra Politics | अनिल परब यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपूर्वीच ऋतुजा लटके यांना मोठा विजय मिळेल, असा दावा केला होता. याठिकाणी ऋतुजा लटके ९० ते ९५ टक्के मतं मिळवतील, असे अनिल परब यांनी म्हटले होते. तसेच ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनीही ऋतुजा लटके ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतं घेऊन निवडून येतील, असा दावा केला होता. आठव्या फेरीअखेर मतमोजणीचे निकाल पाहता शिवसेना नेत्यांचा हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे.

 

Rutuja Latke Bypoll
अंधेरी पूर्व पोटनिवडणूक

हायलाइट्स:

  • नोटाला आतापर्यंत ५६५५ मतं मिळाली आहेत
  • ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे
मुंबई: अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या अपेक्षेप्रमाणे विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सकाळी आठ वाजता अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. याठिकाणी मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्या पार पडणार आहेत. यापैकी आठ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यामध्ये ऋतुजा लटके यांनी मोठी आघाडी घेतली आहे. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना आठव्या फेरीअखेर २९०३३ मतं पडली आहेत. तर नोटाने (NOTA votes) दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली आहे. नोटाला आतापर्यंत ५६५५ मतं मिळाली आहेत. ही मतं लक्षणीय असली तरी सध्याची परिस्थिती पाहता ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या (ठाकरे गट) गोटात या विजयाच्या सेलिब्रेशनची तयारी सुरु झाली आहे. थोड्याचवेळात शिवसैनिक हे शिवसेना भवनात जमून या विजयाच्या सेलिब्रेशनला सुरुवात करणार आहेत. मात्र, हे निकाल पाहता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची सूत्रे हाताळणाऱ्या अनिल परब यांचे भाकीत अचूक ठरण्याची शक्यता आहे.

अनिल परब यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपूर्वीच ऋतुजा लटके यांना मोठा विजय मिळेल, असा दावा केला होता. याठिकाणी ऋतुजा लटके ९० ते ९५ टक्के मतं मिळवतील, असे अनिल परब यांनी म्हटले होते. तसेच ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनीही ऋतुजा लटके ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतं घेऊन निवडून येतील, असा दावा केला होता. आठव्या फेरीअखेर मतमोजणीचे निकाल पाहता शिवसेना नेत्यांचा हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस आधी मतदारसंघात नोटाला मतदान करा, असा प्रचार सुरु झाला होता. या प्रचाराचे परिणाम आजच्या निकालात पाहायला मिळत आहेत. कारण, आतापर्यंत आकडेवारीनुसार, आठव्या फेरीअखेर नोटाला ५६५५ मतं मिळाली आहेत. त्यामुळे सर्व अपक्ष उमेदवारांना मागे टाकत नोटाने दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली आहेत.
Andheri Bypoll Results: सूनबाईंची विजयाच्या दिशेने घोडदौड, लेकाची आठवण काढत रमेश लटकेंचे वडील म्हणाले…

रवींद्र वायकर काय म्हणाले होते?

रवींद्र वायकर यांच्या विश्लेषणानुसार, अंधेरी पूर्व परिसरात शिवसेनेची ३१ टक्के, काँग्रेस २८ टक्के आणि भाजपची २५ टक्के मतं आहेत. उर्वरित १४ टक्के मतं ही मनसे आणि इतर पक्षांची आहेत. या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या निधनामुळे सहानुभूतीचा फॅक्टर हा ऋतुजा लटके यांच्या बाजूने आहे. या सगळ्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना एकूण मतांपैकी तब्बल ६५ टक्के मतं मिळतील, असा दावा रवींद्र वायकर यांनी केला होता.

Andheri Bypoll Result: पहिल्या तीन-चार तासांमध्येच ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित होणार?

ऋतुजा लटकेंना ६० हजारांच्या आसपास मतं मिळणार?

मतमोजणीच्या पहिल्या आठ फेऱ्यांचे निकाल समोर आल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ऋतुजा लटके यांना १९ वी फेरी संपेपर्यंत तब्बल ६० हजार मतं मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसे घडल्यास हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा ठरेल. या पोटनिवडणुकीत अवघ्या ८५,६९८ नागरिकांनी मतदान केल्याने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना निर्भेळ विजय मिळाल्याचे दाखवायचे असल्यास मोठ्या मताधिक्याने निवडून येणे गरजेचे आहे.ही पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र लढवली होती. अंधेरी पूर्व भागातील शिवसेनेची पारंपरिक व्होटबँक आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतदारांचा टक्का लक्षात घेता ऋतुजा लटके यांना ४५ ते ५० हजार इतकी मतं पडतील, अशी अपेक्षा आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं ऋतुजा लटके यांच्याकडे ट्रान्सफर होणार का, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here