मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्या ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित झाला आहे. या पोटनिवडणूक निकालात १८व्या फेरीअखेर ऋतुजा लटके यांना ६५ हजार ३३५ मते मिळाली आहेत, तर दुसऱ्या क्रमांची १२ हजार ६९१ इतकी मते ‘नोटा’ला (NOTA) मिळाली आहेत. ‘हा विजय मी माझ्या पतीला समर्पित करत आहे, कारण त्यांनी मतदारसंघात जी विकासकामे केली आहे, त्याचीच ही पोचपावती आहे. मला या निवडणुकीत विजय मिळाला असला तरी कोणत्या प्रकारचा जल्लोष केला जाणार नाही. कारण पतीच्या दुर्दैवी निधनानंतर मला निवडणूक लढवावी लागली होती,’ असं ऋतुजा लटके म्हणाल्या.

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अखेरच्या दिवशी भाजप नेतृत्वाच्या सांगण्यावरून पटेल यांनी आपला अर्ज मागे घेतला. भाजप उमेदवाराच्या माघारीने ऋतुजा लटके यांच्या मार्ग मोकळा झाला होता. परंतु या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांकडून ‘नोटा’ला मतदान करण्यासाठी प्रचार सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटातील नेत्यांनी केल्याने नवा ट्विस्ट निर्माण झाला. त्यातच आज लागलेल्या निकालात ‘नोटा’ला लक्षवेधी मते मिळाल्याने या आरोपाला आणखीनच बळ मिळालं. या निवडणुकीतील विजयी उमेदवार ऋतुजा लटके यांनीही आपल्या पत्रकार परिषदेत ‘नोटा’चं गणित सांगत भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

Andheri Bypoll: नोटाला जास्त मतं का पडली? ठाकरे गटाचे ‘चाणक्य’ अनिल परबांनी सांगितलं कारण

नोटा आणि भाजपबद्दल काय म्हणाल्या ऋतुजा लटके?

‘अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत नोटाला जी मते मिळाली आहेत, ती सर्व भाजपची मते आहेत. आपल्याला या निवडणुकीत एवढीच मते मिळणार आहेत, हा अंदाज आल्यानेच भाजप उमेदवाराने ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. कारण यासंदर्भात त्यांनी एक सर्व्हेदेखील केला होता. त्यांना जर खरंच माझ्याबाबत सहानुभूती असती तर त्यांनी आधी अर्जच भरला नसता,’ असा घणाघात ऋतुजा लटके यांनी केला आहे.

दरम्यान, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व आमचे नेते अनिल परब यांच्या नेतृत्वात हा विजय मिळााला असल्याचंही ऋतुजा लटके यांनी स्पष्ट केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here