Maharashtra Politics | सकाळी आठ वाजल्यापासून अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच ऋतुजा लटके आघाडीवर होत्या. ऋतुजा लटकेंना एकूण ६६ हजार २४७ मतं मिळवली. नोटाला १२ हजार ७७८ मतं मिळाली आणि १ हजार ५६९ मतांसह राजेश त्रिपाठी तिसऱ्या स्थानावर राहिले. या विजयानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला डिवचले आहे.

हायलाइट्स:
- आता नोटाला जितकी मतं पडली आहेत, तेवढीच मतं भाजपला मिळाली असती
- उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
सकाळी आठ वाजल्यापासून अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच ऋतुजा लटके आघाडीवर होत्या.
ऋतुजा लटकेंना एकूण ६६ हजार २४७ मतं मिळवली. नोटाला १२ हजार ७७८ मतं मिळाली आणि १ हजार ५६९ मतांसह राजेश त्रिपाठी तिसऱ्या स्थानावर राहिले. ऋतुजा लटके यांच्या विजयाने ठाकरे गटाच्या शिवसेनेने शिंदेंच्या बंडानंतर मशाल चिन्हावर पहिला आमदार निवडून आणला आहे. मशाल चिन्हावरील हा विजय उद्धव ठाकरेंचा खूप महत्वाचा आणि बळ देणारा ठरण्याची शक्यता आहे.
या पोटनिवडणुकीनंतर ठाकरे गटात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या विजयानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देताना अंधेरी पोटनिवडणुकीत नोटाला मिळालेली मतं ही भाजपची असल्याचा दावा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्या पत्रकार परिषदेत हाच सूर लावला. भाजपच्या मुरजी पटेल यांनी अंधेरी पोटनिवडणूक लढवली असती तरी आता नोटाला जितकी मतं पडली आहेत, तेवढीच मतं भाजपला मिळाली असती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
नोटाला मिळालेली मतं अवैध- अनिल परब
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मशाल हे चिन्हा घेऊन पहिला विजय मिळवला आहे. पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह घेऊन शिवसैनिकांनी पोटनिवडणुकीत जो प्रचार केला, काम केलं, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वी पैसे देऊन नोटाचा प्रचार केला जात होता. कायद्यानुसार नोटाचा प्रचार करता नाही. नोटाचा वापर हा ऐच्छिक आहे. ज्याला वाटतं वरीलपैकी कोणताही उमेदवार योग्य नाही, त्याला नोटाचं बटण दाबण्याचा अधिकार आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी काही ठिकाणी पैसे देऊन नोटाचा प्रचार सुरु होता. आम्ही पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली होती. मी स्वत: निवडणूक आयोगाकडे नोटाचा प्रचार सुरु असतानाचा व्हिडिओ दिला होता. लेखी सूचनाही दिली होती. मात्र, पोलीस आणि निवडणूक आयोगाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नोटाला मिळालेली मतं, ही गैरमार्गाने मिळवण्यात आली आहेत, असा आरोप अनिल परब यांनी केला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.