एक ८५ वर्षांचा वृद्ध अपार्टमेंटच्या खिडकीला अचानक लटकला. तो १५० फूट उंचीवरून खाली कोसळणार होता. मात्र सुदैवानं त्याचा पाय खिडकीच्या फ्रेममध्ये अडकला. आसपासच्या इमारतीमधील रहिवासी त्याला वाचवण्यासाठी पोहोचले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनीदेखील घटनास्थळ गाठलं. अखेर वृद्धाचा जीव वाचला.

डेली मेलच्या वृत्तानुसार ही धक्कादायक घटना चीनच्या शाओगुआनमधील आहे. ८५ वर्षीय वृद्धाच्या मेंदूवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. वृद्ध अपार्टमेंटच्या खिडकीबाहेर लटकत होता. वृद्धाचा पाय खिडकीच्या फ्रेममध्ये अडकला. यानंतर काही जणांनी आपत्कालीन सेवेशी संपर्क साधला. काही जण फ्लॅटमध्ये पोहोचले. वृद्ध पडू नये म्हणून त्यांना चादर बांधली.
बूट घालताच ७ वर्षांच्या मुलाला तीव्र वेदना; एकापाठोपाठ ७ हार्ट अटॅक आल्यानं करुण अंत
वृद्धाला वाचवण्यात यांग नावाच्या महिलेनं महत्त्वाची भूमिका बजावली. यांग शॉपिंग करण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी वृद्धाला लटकलेल्या स्थितीत पाहिलं. त्यांनीच आपत्कालीन सेवेशी संपर्क साधला. यांग यांनी एका तरुणाला आणि महिलेला मदतीसाठी बोलावलं. यानंतर तिघे वृद्धाच्या फ्लॅटमध्ये पोहोचले. ज्या खिडकीच्या बाहेर वृद्ध अडकला होता, ती फार उघडत नव्हती. त्यामुळे वृद्धाला वर खेचणं अवघड होतं.

वृद्धाला अतिशय वेदना सुरू होत्या. त्यामुळे ते विव्हळत होते. त्यांना काही बोलतादेखील येत नव्हतं, असं यांग यांनी सांगितलं. वृद्ध खाली कोसळण्याची भीती यांग यांना वाटत होती. पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर वृद्धाची मुलगीदेखील तिथे पोहोचली. तिने वृद्धाचा जीव वाचवणाऱ्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here