या प्रकरणात शाकिबचे प्रेयसी अंसरीन बुखारी आणि तिची सोशल मीडिया एन्फ्ल्यूएन्सर मुलगी महक बुखारी यांच्यासह ८ जणांची नावं पुढे आली. या सगळ्यांनी लिसेस्टर क्राऊन कोर्टात सर्व आरोपींना हजर करण्यात आले. मात्र त्यांनी हत्येचा आरोप फेटाळला. शाकिबनं अंसरीन बुखारीला ११०० कॉल केले. या कॉलचा अवधी ५ सेकंद किंवा त्याहून कमी होता. ४५ वर्षांच्या अंसरीननंदेखील २०० कॉल केले. साकिब आणि अंसरीनची मुलगी महक यांच्यातही त्याच दरम्यान ७८ कॉल झाले होते.
पोलिसांनी आरोपींच्या फोनचा डेटा तपासला. ज्या दिवशी शाकिबचा अपघात झाला, त्या दिवशी आरोपींचं लोकेशन लिसेस्टर आणि लॉगबोरोमध्ये आढळलं. तिन्ही कार (एक शाकिबची आणि दोन आरोपींच्या) अपघाताआधी रात्री सव्वाच्या सुमारास एकाच ठिकाणी होत्या. साकिबचा अपघात सिक्स हिल्स जंक्शनजवळ होतं.
शाकिबनं इजाजुद्दीनचा फोन अंसरीन बुखारीला कॉल करण्यासाठी वापरला. कारण त्याचा फोन बंद झाला होता. हा कॉल रात्री १.२४ ते १.२७ च्या दरम्यान करण्यात आला. यानंतर इजाजुद्दीननं ९९९ या आपत्कालीन नंबरवर फोन केला. शाकिब आणि अंसरीन यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. शाकिबनं अंसरीचे अश्लिल व्हिडीओ तिचा पती आणि मुलाला पाठवण्याची धमकी दिली. त्यानंतर महकनं शाकिबच्या हत्येचा कट रचला. शाकिब अंसरीनला ब्लॅकमेल करत असल्यानं महकनं त्याला संपवलं.