मुंबई: गेल्या ऑक्टोबर महिन्यातील तेजीनंतर भारतीय शेअर बाजाराशी संबंधित अनेक तज्ज्ञ गुंतवणूकदारांना नोव्हेंबर महिन्यात कमाईसाठी अनेक स्टॉक्सचे पर्याय सुचवत आहेत. नोव्हेंबर महिन्यात गेल्या काहीवर्षांपासून भारतीय शेअर बाजारासाठी पॉझिटिव्ह ठरला आहे. त्यामुळे यंदा जर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात गुंतवणुकीसाठी स्टॉक्सची निवड करत असाल, तर तुम्ही या शेअर्सचाही विचार करू शकता.

वाढत्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करा

एमके ग्लोबलने (Emkay Global) गुंतवणूकदारांना बहुतांश लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैज लावण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूकदारांना नोव्हेंबर महिन्यात आयसीआयसीआय (ICICI) बँक, इंडसइंड (IndusInd) बँक, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) आणि मारुती सुझुकीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप श्रेणीत कंपनीला आदित्यला बिर्ला फॅशन आणि रिटेल, अशोक लेलँड, एस्कॉर्ट्स कुबोटा, करूर वैश्य बँक, वरुण बेव्हरेजेस आणि वेस्टलाइफ डेव्हलपमेंट पसंत आहेत.

गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई! या शेअर्समध्ये पैसे गुंतवणारे मालामाल, तुमच्याकडे आहेत का?
दुसरीकडे, आयसीआयसीआय सिक्युरिटीजने अशा कंपन्यांवर पैज लावण्याचा सल्ला दिला आहे, ज्या पुढे जाऊन चांगली वाढ नोंदवू शकतात. ब्रोकरेजच्या आवडत्या स्टॉक्समध्ये L&T, एनटीपीसी, कोल इंडिया, एनएचपीसी, अल्ट्राटेक, जेके सिमेंट, अशोक लेलँड, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, टाटा कम्युनिकेशन्स, ग्रीनपॅनेल, सेंच्युरी प्लायबोर्ड, इंद्रप्रस्थ गॅस, गेल, ओएनजीसी, गुजरात फ्लोरोकेमिकल्स, ब्रिगेड एंटरप्राइज आणि फिनिक्स मिल्स यांचा समावेश आहे.

गुंतवणूकदारांची होणार बल्ले-बल्ले..! ७ कंपन्या देणारहेत अंतरिम लाभांश, जाणून घ्या सविस्तर तपशील
याशिवाय उपभोग थीमवर असताना ICICI सिक्युरिटीजने टाटा मोटर्स, डाबर इंडिया, नेस्ले, ज्योती लॅब्स, सॅफायर फूड्स आणि मेट्रो ब्रँड्सची निवड केली आहे. तर हेल्थकेअर विभागात डॉ. रेड्डीज, टोरेंट फार्मा आणि अल्केम लॅबची नावे आहेत. तर बँकिंग क्षेत्रात एसबीआय आणि इंडसइंड बँक यांना प्राधान्य दिले आहेत. आशिका स्टॉक ब्रोकिंगच्या नोव्हेंबरमधील टॉप-पिक्स रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि टायटन कंपनी आहेत. या तिन्ही लार्ज कॅप कंपन्या आहेत.

दीर्घकालीन दृष्टीकोनातून बाजारात तेजीचा अंदाज
याशिवाय महागाई कमी करण्यासाठी आक्रमक पावले उचलली जात असून त्यात सुधारणा अपेक्षित असल्याचे ॲक्सिस सिक्युरिटीजचे मत आहे. पण असे असूनही तेल आणि वस्तूंच्या वाढलेल्या किमती पुढील काही तिमाहींसाठी आव्हान राहणार आहेत. मात्र, दीर्घकालीन दृष्टीकोनातून बाजार वाढत राहिल्याची अपेक्षा असून अल्पावधीत अस्थिरता असू शकते. त्यामुळे सध्याच्या सेटअपनुसार प्रत्येक घसरणीला खरेदी करणे उचित ठरेल. गुंतवणुकीचे क्षितिज किमान १२ ते १८ महिने असावे.

गुंतवणूकदार एका झटक्यात करोडपती; या आयपीओंनी धूम उडवून दिली, पैसे लावण्यापूर्वी पाहा लिस्ट
ब्रोकरेज हाऊसला ICICI बँक, टेक महिंद्रा, मारुती सुझुकी इंडिया, एसबीआय, दालमिया भारत, फेडरल बँक आणि वरुण बेव्हरेजेसचे शेअर्स पसंत आहेत. तसेच ब्रोकरेजला अशोक लेलँड, एस्ट्रल, बाटा इंडिया, एपीएल अपोलो ट्यूब्स, हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्रायझेस, प्राज इंडस्ट्रीज, सीसीएल उत्पादने, पॉलीकॅब इंडिया आणि बजाज फायनान्स सारखे स्टॉक देखील आवडतात. ब्रोकरेजला या समभागांमध्ये ११-३३ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

(टीप: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here