दुसरीकडे, भारतीय बाजाराबद्दल बोलायचे तर आज बँक निफ्टीमध्ये मजबूत वाढीसह व्यवसाय सुरू झाला आहे आणि सर्वकालीन उच्चांकाच्या जवळ पोहोचला आहे. आज रुपयाची सुरुवातही मजबूत झाली असून ३३ पैशांच्या वाढीसह उघडला आहे. रुपयाच्या सुरुवातीच्या व्यापारात ८२.११ रुपये प्रति डॉलरची पातळी दिसून आली.
नवीन आठवड्यात बाजाराची सुरुवात
आजच्या व्यवहारात बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स २३७.७७ अंक किंवा ०.३९ टक्क्यांच्या वाढीसह ६१,१८८ वर उघडला. तर, एनएसईचा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी ९४.६० अंक किंवा ०.५२ टक्क्यांच्या मजबूतीसह १८,२११ वर उघडण्यात यशस्वी झाला आहे.
सेन्सेक्स-निफ्टीची सुरुवात
आज, बीएसई सेन्सेक्सच्या ३० समभागांपैकी २६ समभागांमध्ये सुरुवातीच्या व्यवहारात सकारात्मक वाढ दिसून आली तर दुसरीकडे, निफ्टीच्या ५० पैकी ३९ समभाग तेजीत आहेत आणि ११ समभाग घसरणीसह व्यवहार करताना दिसत आहेत.
बँक निफ्टी हा आजचा स्टार
दरम्यान, आजच्या दिवसाच्या सुरुवातीला बँक निफ्टी सार्वकालिक उच्चांकाच्या जवळ असून सेन्सेक्सचा सर्वाधिक लाभ घेत भारतीय स्टेट बँक (एसबीआय) सुमारे ४ टक्क्यांनी वाढला आहे. तसेच बँक ऑफ बडोदा सुमारे १० टक्क्यांच्या वाढीसह १५८.३५ रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी बँक देखील नफ्याच्या हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत.
सेन्सेक्समध्ये कोणते शेअर्स वधारले
एसबीआय, मारुती, HUL, ॲक्सिस बँक, नेस्ले, विप्रो, M&M, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, ITC, टेक महिंद्रा, PowerGrid, इन्फोसिस, टीसीएस आणि बजाज फायनान्स या शेअर्समध्ये वाढ दिसत आहे. तर ब्रिटानियाचा शेअरही आज १० टक्क्यांनी वाढला आणि तो बाजारातील टॉप गेनर्सपैकी एक आहे.
मार्केटचे प्री-ओपनिंग
आज, शेअर बाजाराच्या पूर्व प्रारंभी बीएसई सेन्सेक्स १५ अंकांच्या किरकोळ वाढीसह ६०,९६५ च्या स्तरावर दिसला, तर एनएसईनिफ्टी ९३ अंकांच्या किंवा ०.५१ टक्क्यांच्या वाढीसह १८,२१० च्या पातळीवर व्यवहार करत होता. सुरुवातीच्या काळात सेन्सेक्स लाल चिन्हात वारंवार घसरत होता.