वॉशिंग्टन: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने शुक्रवारी सुमारे आपल्या निम्म्या कर्मचाऱ्यांची कामावरून हकालपट्टी केली. जगातील सर्वात मोठे श्रीमंत व्यक्ती, एलन मस्क, कंपनीचे मालक झाल्यानंतर टाळेबंदीची ही मोठी कारवाई करण्यात आली, त्यामुळे हजारो कामगार क्षणार्धात बेरोजगार झाले. भारतही मस्कने ट्विटरच्या जवळपास संपूर्ण टीमला हकलून दिले. मात्र आता ट्विटरने काढलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना परत बोलावले आहे. यातील काही कर्मचाऱ्यांना चुकून काढून टाकण्यात आले, असे सूत्रांच्या हवाल्याने ब्लूमबर्गच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार कंपनी व्यवस्थापनाने काही लोकांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले होते. आणि आता कंपनीला हे कळत आहे की मस्कचा ध्येय पुढे नेण्यासाठी या कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यामुळेच त्यांना परत बोलावण्यात येत आहे.

Twitter युजर्स लक्ष द्या,’हे’ काम केल्यास Elon Musk सस्पेंड करणार तुमचे अकाउंट, ब्लू टिकही जाणार
मस्कने गेल्या महिन्यात ट्विटर विकत घेण्यासाठी तब्बल ४४ अब्ज डॉलरचा करार पूर्ण केला. तेव्हापासून मस्क ॲक्शनमध्ये आले आहेत. प्रथम, त्यांनी कंपनीचे भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पराग अग्रवाल यांच्यासह चार उच्च अधिकार्‍यांची हकालपट्टी केली. तर नंतर कंपनीचे बोर्ड बरखास्त करून कंपनीची सूत्रे पूर्णपणे आपल्या हाती घेतली. मस्क एवढ्यावरच थांबले नाही. कंपनीने शुक्रवारी सुमारे ३,७०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. अमेरिकेतील काही कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले आहे.

Twitter मधील टाळेबंदीवर को-फाउंडर जॅक डोर्सी यांनी सोडले मौन; म्हणाले- ‘याला मी जबाबदार आहे…’
मस्क काय म्हणाले
व्यवस्थापनाने घाईघाईने कारवाई केल्याचे आता कंपनीच्या लक्षात येत आहे. ट्विटरच्या प्रवक्त्याने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. टाळेबंदीनंतर शुक्रवारी मस्क यांनी ट्विट केले, “ट्विटरच्या कर्मचार्‍यांमध्ये कपात करण्याबाबत कंपनीकडे दुसरा कोणताही पर्याय नाही.” कंपनीचे दिवसाला ४ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होत असल्याचे मस्क यांनी लक्षात आणून दिले. दरम्यान, काढून टाकलेल्या कर्मचार्‍यांना तीन महिन्यांचे वेगळे पॅकेज (भरपाई) देण्यात आले आहे, जे कायदेशीर गरजेपेक्षा ५० टक्के जास्त आहे.

ट्विटरमध्ये आता ३७०० कर्मचारी शिल्लक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कर्मचारी कपात होण्यापूर्वी कंपनीत सुमारे ७५०० कर्मचारी कार्यरत होते. याशिवाय मस्क यांनी उर्वरित कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस काम करण्यास सांगितले असल्यामुळे आता काही कर्मचारी कार्यालयातच रात्र काढत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

मी ८ महिन्यांची गर्भवती, कुशीत ९ महिन्यांचं बाळ, Twitter ने काढलेल्या महिलेची आपबिती
ट्विटरने गेल्या आठवड्यात ‘ब्लू टिक’साठी पैसे मोजण्याची योजना आखली. यानुसार, ब्ल्यू टिक घेण्यासाठी यूजर्सना दरमहा आठ डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयात तब्ब्ल ६६० रुपये मोजावे लागतील. दरम्यान, न्यूयॉर्क टाइम्सने रविवारी सांगितले की ट्विटरने मध्यावधी निवडणुकीपर्यंत ही योजना पुढे ढकलली आहे. अमेरिकेत ८ नोव्हेंबरला मध्यावधी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये ट्विटरच्या योजनेचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती यूजर्स आणि कर्मचाऱ्यांना वाटत होती.

भारतात ब्लू टिक
दरम्यान, भारतात सशुल्क ब्लू टिक सेवा महिनाभरात सुरू होईल असे मस्क यांनी म्हटले आहे. मात्र, भारतात यासाठीच्या शुल्काबाबत कोणतेही अधिकृत विधान केले नाही. सध्या ब्लू टिक सब्सक्रिप्शन पाच देशांसाठी ७.९९ डॉलर म्हणजेच ६५५ रुपये प्रति महिना शुल्कावर सुरू झाले आहे. यामध्ये अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड (यूके) यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here