मुंबई : राज्यात परतीच्या पावसानंतर आता थंडीची चाहूल सुरू झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये असलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रमध्येही हूडहूडी भरली आहे. पुणे, सातारा या भागांमध्ये तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळतं तर मुंबई, नवी मुंबई या भागांतही रात्रीच्या तापमानात घट झाल्याचं दिसून आलं. यामुळे एकीकडे पावसाचा अंदाज असताना दुसरीकडे राज्यात थंडीही वाढत आहे.
दरम्यान राज्यातल्या सर्वात महत्त्वाच्या भागात म्हणजे महाबळेश्वरमध्ये चांगलीच थंडी वाढली आहे. महाबळेश्वर इथंही किमान तापमान १३ अंशापर्यंत पोहोचलं आहे. सध्याचे हवामान पाहता इथे पर्यटनाच्या दृष्टीने वाई, पाचगणी, भिलार, भोसे इथं पर्यटकांची संख्याही वाढ वाढली आहे.