एसबीआयचा विक्रमी नफा
बँकेने शनिवारी सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करत आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा कमावला आहे. एसबीआयचा एकत्रित नफा दुसऱ्या तिमाहीत १४,७५२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यासह एसबीआय देशातील सर्वात नफा कमावणारी वित्तीय संस्था ठरली आहे. एवढेच नाही तर मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला मागे टाकत एसबीआयने मानाचे स्थान मिळवले आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये रिलायन्सचा नफा १३,६५६ कोटी रुपये होता.
शेअर्सची स्थिती
दरम्यान, या वर्षात आतापर्यंत एसबीआयचे शेअर्स ३१ टक्क्यांनी वधारले आहेत. पण कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचे म्हणणे आहे की त्याचे मूल्यांकन अजूनही फारसे जास्त नाही. ब्रोकरेज फर्मने आपली लक्ष्य किंमत ७२५ रुपये केली आहे. तर जागतिक ब्रोकरेजनेही आपली लक्ष्य किंमत वाढवली आहे. मॉर्गन स्टॅनलीने ते ७१५ रुपये, नोमुरा ६९० रुपये, जेपी मॉर्गन ७२० रुपये, जेफरीज ७६० रुपये आणि गोल्डमन सॅक्सने ७७० रुपये ठेवले आहेत.
नफ्यात वाढ
बँकेचा एकत्रित नफा दुसऱ्या तिमाहीत १४,७५२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ११,१२५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी पत वाढीचा अंदाज सुधारित १४-१६% केला आहे.