‘करोनाच्या आजच्या परिस्थितीत आपण स्वतःच्या मुलाला तरी त्याचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवू का? हा प्रश्न यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारावा आणि विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ‘परीक्षा’ या विषयाचा एकदाचा ‘निकाल’ लावावा,’ अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.
वाचा:
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा घ्यायची की नाही, हा मुद्दा सध्या विविध पातळ्यांवर चर्चेत आहे. हा मुद्दा आता केवळ शिक्षण क्षेत्र किंवा सरकार, पालक-विद्यार्थी यांच्यापुरता न राहाता लोकप्रतिनिधींकडेही नागरिक यासंबंधी विचारणा करू लागल्याचे पवार यांच्या ट्विटवरून दिसून येते. यासंबंधी विद्यार्थी आणि पालक आपल्याकडे तीव्र भावना व्यक्त करू लागल्याचा उल्लेख पवार यांनी केला आहे. राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोग () अद्यापही परीक्षा घेण्यावर ठाम आहे. त्यामुळे यूजीसीच्या अधिकाऱ्यांना उद्देशून पवार यांनी ट्विट केले आहे.
वाचा:
‘करोनाला घाबरून स्वतः सुरक्षितपणे ऑनलाइन बैठका घेणाऱ्या यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये. प्रचंड मानसिक तणावात असलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेबाबत त्यांच्या तीव्र भावना रोज आम्हा लोकप्रतिनिधींकडे व्यक्त करतात. करोनाच्या आजच्या परिस्थितीत आपण स्वतःच्या मुलाला तरी त्याचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवू का? हा प्रश्न या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारावा आणि विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ‘परीक्षा’ या विषयाचा एकदाचा ‘निकाल’ लावावा,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारने परीक्षा रद्द केल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर हा विषय संपला असे वाटून काही काळ चर्चा थांबली होती. मात्र, अलीकडेच यूजीसीने राज्यांना यासंबंधी मार्गदर्शक सूचना पाठविल्या आहेत. त्यात परीक्षा घेण्यासंबंधी उल्लेख आहे. कायद्यानुसार यूजीसीच्या या सूचना राज्य आणि विद्यापीठांना बंधनकारक असल्याचे काही तज्ज्ञ सांगत आहेत. तर राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांमध्ये पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. एका बाजूला या विषयाकडे काही मंडळी राजकारण म्हणून पाहत असताना दुसरीकडे नेमका निर्णय होत नसल्याने आणि दिवस हळहळू पुढे सरकत असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. तीच आता लोकप्रतिनिंधीकडे व्यक्त होताना दिसत आहे.
वाचा:
आता टेलिग्रामवरही आहे. लेटेस्ट बातम्या आता मोबाइलवरही मिळवा. फॉलो करण्यासाठी
.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times