परभणी : पत्नीला घ्यायला सासरी आल्यानंतर पत्नीने नांदायला येण्यास नकार दिल्यामुळे पतीने रागाच्या भरात पत्नीच्या गळ्यावर ब्लेडने वार करून जखमी केल्याची घटना परभणीच्या सेलू शहरातील अरब गल्ली इथे घडली आहे. या प्रकरणी लक्ष्मी राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जावई रमेश नामदेव चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

जालना जिल्ह्यातील अंबुडा येथील रमेश नामदेव चव्हाण हे आपल्या पत्नीला घेण्यासाठी सेलु शहरातील आरब गल्ली येथे आले होते. त्यांनी आपल्या पत्नीला नांदायला चल असे म्हणाले असता पत्नीने नांदायला येण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या रमेश चव्हाण यांनी खिशातून ब्लेड काढून आपल्या पत्नीच्या गळ्यावर वार केले. ब्लेडने वार केल्याने रमेश चव्हाण यांची पत्नी गंभीर जखमी झाल्याने तिला नातेवाईकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Maharashtra Cold Wave : राज्यात थंडीचा तडाखा वाढला, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घट
हा प्रकार घडल्यानंतर रमेश चव्हाण यांची सासू लक्ष्मीबाई राठोड यांनी सेलू पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरून आरोपी जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, पोलीस उपनिरीक्षक पुरी यांनी आरोपी जावई रमेश चव्हाण याला ताब्यात घेतले आहे. पत्नीने नांदायला येण्यास नकार दिल्याने पतीने केलेल्या या भयानक कृत्यामुळे परिसरामध्ये दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान मागील काही दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांनी या घटनांना आळा घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

सोशल मीडियावरील मैत्री प्रेमात बदलली, एकमेकांच्या खूप जवळ आले अन्…; संपूर्ण परिसरात खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here