Maharashtra Politics | शिंदे गटाचे तीन मंत्री सध्या आमचे रडारवर आहेत. रवींद्र चव्हाण हे भायखळ्यातील एका बलात्काराचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. तर गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांनी महिलांचा अवमान करणारी वक्तव्य केली आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने या तिघांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केली.

हायलाइट्स:
- अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादात
- सुप्रिया सुळे यांच्यावर अर्वाच्च्य भाषेत टीका
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात अब्दुल सत्तार यांच्यासारखे नेते महिलांविषयी काहीही बोलतात. तरीही ते मंत्रिपदावर राहतातच कसे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्याव. अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात बसू देणार नाही. शिंदे गटाचे तीन मंत्री सध्या आमचे रडारवर आहेत. रवींद्र चव्हाण हे भायखळ्यातील एका बलात्काराचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. तर गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांनी महिलांचा अवमान करणारी वक्तव्य केली आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने या तिघांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केली.
अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले?
एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अब्दुल सत्तार यांनी “इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ”, असं म्हटलं. यानंतर पुन्हा एकदा सत्तार यांनी “ते आम्हाला खोके बोलू लागले आहेत, आमचे खोके त्यांचे डोके तपासावे लागेल, ज्यांचे डोके तपासावे लागेल खोक्याची आठवण येऊ लागली आहे त्यांच्यासाठी सिल्लोडमध्ये दवाखाना उघडावा लागेल. त्या दवाखान्यात खोके खोके बोलतात त्यांचे डोके तपासावे लागले. हे भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतोस, असे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले.
महिला नेत्या आक्रमक
महाराष्ट्रातील अनुभवी मंत्र्यानं घाणेरड्या पातळीवर जाऊन बोलणं चुकीचं आहे. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा काँग्रेस पक्षातर्फे निषेध करते. सत्तार यांनी या प्रकरणी माफी मागावी, असं काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबरे यांनी अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे. सत्तार यांनी या प्रकरणी माफी मागावी, असा इशारा रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं.
तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही व्यक्तीने महिला किंवा पुरुषांविषयी आदरयुक्त टीका केली पाहिजे. खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये. तसेच प्रसारमाध्यमांनीही अशा वक्तव्यांचे भांडवल करु नये, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.