Bhagyashree Rasal | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Nov 2022, 3:52 pm

Har Har Mahadev Controversy वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमानंतर आता हर हर महादेव सिनेमाही वादात सापडला आहे. पुण्यात संभाजी ब्रिगेडनं हर हर महादेव सिनेमाला जोरदार विरोध केला आहे. ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील काही शो बंद पाडले आहेत.

 

har har mahadev movie
मुंबई : प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर आणि सुबोध भावे यांचा बहुचर्चित हर हर महादेव सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमात इतिहासाची मोडतोड करून दाखवण्यात आल्याच्या कारणावरून संभाजी बिग्रेड आक्रमक झाली आहे. पिंपरी इथल्या मंगला टॅाकिजमधील सिनेमाचे आजचे नियोजित चार शो रद्द केले आहेत. हर हर महादेवचे शो रद्द करा. पोस्टर काढून टाका अन्यथा परिणामांना सामोरे जा, असं निवेदन संभाजी ब्रिगेडकडून मंगला चित्रपटगृहाच्या संचालकांना दिलं आहे.
शाहरुखचा खलनायक सुद्धा त्याच ताकदीचा हवा म्हणून जॉन… ‘पठाण’च्या दिग्दर्शकाचा खुलासा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांवर आधारित अनेक सिनेमे प्रदर्शित होत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हर हर महादेव हा सिनेमातून जो इतिहास दाखवला आहे, तो चुकीचा असल्याच सांगत संभाजी ब्रिगेडनं त्याला विरोध केला आहे. इतकंच नाही तर या सिनेमात इतिहासाची चेष्टा केली आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा अवमान केला आहे. छत्रपती शिवराय रामदासी वेशात दाखवलं आहे. तसंच या सिनेमात अनेक गोष्टी, घटना दाखवल्या आहेत त्या इतिहासाला धरून नाहीत. त्यामुळे या सिनेमामुळे इतिहासाचा अवमान होत असल्याचं सांगत संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या सिनेमाचा शो बंद पाडला आहे. इतिहासाची मोडतोड करणारा, खोटा इतिहास दाखवणारा ‘हर हर महादेव’ सिनेमा तात्काळ बंद करावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं बंद पाडले, असा इशाराही दिला आहे.
अंकुर वाढवेचं मोठं यश, या अवघड परिक्षेत पास होणारा भारतातील एकमेव विद्यार्थी
संभाजी ब्रिगेडचे आक्षेप
चित्रपटात छत्रपती शिवराय रामदासी वेषात दाखवण्याचा मुर्खपणा केला आहे. बाजीप्रभू शिवरायांच्या प्रतापगड मोहिमेत दाखवणे म्हणजे इतर मराठा सरदार यांनी शिपायाची भूमिका करण्यासारखं आहे. कान्होजी जेधे खलीता घेऊन बाजीप्रभू यांच्याकडे गेलेले दाखवणे म्हणजे जेधे यांना शिपाई करण्यासारखे आहे, असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे. छत्रपतींना अफजलखानाने जिरे टोपावर वार केलेला दाखवला आहे. डोक्यातून रक्त येताना दाखवले आहे. हा तर मोठा विनोद आहे. छत्रपतींवर वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी हा अफजालखानाचा वकील होता. त्याने छत्रपतींवर वार केलेला होता हे न दाखवता अफजलखानानेच वार केला, असं खोटं दाखवलं आहे, असा आक्षेप संभाजी ब्रिगेडने घेतला आहे.

दरम्यान, कालच संभाजीराजे छत्रपती यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये हर हर महादेवच्या निर्मात्यांना इतिहासाची मोडतोड केल्याबद्दल फटकारले होते. संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतल्यानंतर आता पिंपरीतील विशाल थिएटरमध्ये हर हर महादेवचा शो बंद पाडला आहे. दरम्यान, महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली होती. या सिनेमाची घोषणा झाल्यानंतरही त्याला विरोध होऊ लागला आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here