Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Nov 2022, 4:36 pm

Accident News : उदगीरमधील काहीजण एम.एच १३ सीएस ९९५५ क्रमांकाच्या कारने लातूरला मुलगी पाहण्यासाठी निघाले होते. दुपारी ते लातूरपासून जवळच असलेल्या भातांगळी पाटीजवळ येताच समोरून एम.एच ४९ एल ४३७७ या क्रमांकाचा आयशर टेम्पो भरधाव वेगात आला.

 

Latur Accident News
लग्नासाठी मुलगी पाहायला गेले, मात्र मृत्यूने वाट रोखली, आयशर-कारच्या भीषण अपघातात दोघांनी प्राण गमावले

हायलाइट्स:

  • मुलगी पहायला निघालेल्या सहा जणांवर काळाचा घाला
  • कार टेम्पोच्या भीषण अपघात, कारचा चक्काचूर
  • दोन जागीच ठार, चार जण गंभीर जखमी
लातूर : लातूरपासून जवळ असलेल्या भातांगळी पाटीजवळ एक भीषण अपघात झाला आहे. लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या सहा जणांवर काळाने घाला घातला. कार आणि टेम्पोच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना लातूर जिल्ह्यात घडली.

उदगीरमधील काहीजण एम.एच १३ सीएस ९९५५ क्रमांकाच्या कारने लातूरला मुलगी पाहण्यासाठी निघाले होते. दुपारी ते लातूरपासून जवळच असलेल्या भातांगळी पाटीजवळ येताच समोरून एम.एच ४९ एल ४३७७ या क्रमांकाचा आयशर टेम्पो भरधाव वेगात आला. या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

ICCकडून विराट कोहलीचा गौरव; वर्ल्डकप जिंकण्याआधी टीम इंडियाला मिळाली आनंदाची बातमी
या अपघातात उदगीरमधील समता नगरमधील रहिवासी तानाजी कुमदाळे आणि अन्य एक जण जागीच ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी लातूर येथील स्वर्गीय विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले आहे. जखमींचा प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

EWS आरक्षणाचा फायदा कोणाला मिळणार; प्रमाणपत्र कसे मिळवाल?; जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here