Maharashtra Politics | अब्दुल सत्तार यांनी सोमवारी सकाळी साधारण बाराच्या सुमारास सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अवघ्या काही तासांमध्ये या आंदोलनाचे लोण मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे अशा विविध भागांमध्ये पसरले. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन केले.

हायलाइट्स:
- अब्दुल सत्तारांना वादग्रस्त वक्तव्य भोवले
- मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
अब्दुल सत्तार यांनी सोमवारी सकाळी साधारण बाराच्या सुमारास सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अवघ्या काही तासांमध्ये या आंदोलनाचे लोण मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे अशा विविध भागांमध्ये पसरले. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन केले. तर अब्दुल सत्तार यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान आणि औरंगाबाद येथील घरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धडक मारली. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष विद्या चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावर स्वस्थ बसून देणार नाही, असे विद्या चव्हाण यांनी ठणकावून सांगितले.
आदित्य ठाकरेंची टीका
अब्दुल सत्तार यांनी केलेला हा सेल्फ गोल सिल्लोडमध्ये असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या पथ्यावर पडला. आदित्य ठाकरे यांनी आपल्या सभेत, ‘अब्दुल सत्तार यांच्यासारखी घाणेरडी लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवेत का, असे लोक मंत्री म्हणून चालणार आहेत का’, असा सवाल विचारत शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तसेच घटनाबाह्य सरकारमधील कृषीमंत्री कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित गर्दीला विचारला. आदित्य ठाकरे यांनी अब्दुल हे नाव उच्चारतात गर्दीतून ‘गद्दार’ असा घोष झाला. यामुळे अब्दुल सत्तार यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
अब्दुल सत्तार यांना पुन्हा झापलं
यापूर्वी केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्य सरकार नवी योजना सुरु करेल, अशी घोषणा अब्दुल सत्तार यांनी परस्पर करून टाकली होती. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा कोणताही निर्णय झाला नव्हता. तरीही सत्तार यांनी योजनेसाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीचा विचार न करता अतिउत्साहाच्या भरात शेतकऱ्यांसाठी योजनेची घोषणा केली होती. यावरुन अर्थमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांना चांगलेच फैलावर घेतले होते. यापूर्वी शिंदे गटाचेच मंत्री तानाजी सावंत यांना अशाप्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सक्तीचे मौन बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता अब्दुल सत्तार यांच्यावरही असेच निर्बंध लादले जाणार का, हे पाहावे लागेल.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.