मुंबई : भारतीय संघ टी-20 विश्वचषक २०२२ (T-20 world cup 2022) च्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पण अंतिम सामना कोणामध्ये होणार हा मोठा प्रश्न आहे. खरेतर, १० नोव्हेंबरला भारत अॅडलेडच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध सेमिफायनल खेळणार आहे, त्यानंतर ९ नोव्हेंबरला पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनल होईल. या दोन सामन्यांनंतरच ‘टी-20 वर्ल्ड कप’चा अंतिम सामना कोणत्या संघांमध्ये होणार हे कळेल. मात्र, ही फायनल भारत आणि पाकिस्तान यांच्यातच व्हावी, अशी बहुतेकांची इच्छा आहे. अशा परिस्थितीत उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी भविष्य पाहण्याचा एक अद्भूत मार्ग शोधला आणि ‘वर्ल्ड कप’ची मजा द्विगुणित करत कुत्र्याचा व्हिडिओ शेअर केला. (industrialist anand mahindra tweet about-who would be in the finals of the t20)

कुत्र्याचे निंजा तंत्र पाहून महिंद्रा झाले प्रभावित

industrialist anand mahindra tweet

T 20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये कोण असेल?

६ नोव्हेंबर रोजी आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एका कुत्र्याचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, ‘मी या कुत्र्याला भविष्यात डोकावून पाहण्यास सांगितले आणि २०२२ च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोण असेल हे सांगण्यास सांगितले. वर्तमानाच्या ‘भिंती’च्या पलीकडे पाहण्यासाठी त्याने जबरदस्त जुगाड केले. तुम्हाला काय वाटते, त्याने काय पाहिले असेल?… ही बातमी लिहीपर्यंत ६ लाख २४ हजारांहून अधिक व्ह्यूज, सुमारे २० हजार लाईक्स आणि १५०० हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत.

जेव्हा कुत्र्याने केली कमाल

industrialist anand mahindra tweet

T 20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये कोण असेल?

ही क्लिप ३० ची आहे. या क्लिपमध्ये आपण पाहू शकता की हा कुत्रा भिंतीच्या पलीकडे पाहण्याचा एक अद्भुत मार्ग शोधून काढतो. झाडाच्या आणि भिंतीच्या सहाय्याने तो इतका उंचावर पोहोचतो की पाहणाऱ्यांनाही प्रश्न पडला की भाऊ… जर त्याने हे आश्चर्कारक काम जर केले असेल तर त्याने हे कसे काय बरे केले असेल?

होय, ही क्लिप पाहिल्यानंतर सर्व वापरकर्त्यांनी त्यांच्या मनातील गोष्ट व्यक्त केली. एकाने लिहिले, हा तर जरा अधिकच ताणला गेला. काहींनी लिहिले की तो फायनलमध्ये भारत-पाकिस्तान यांचा सामना पाहत आहे असे वाटते.

व्हायरल व्हिडिओ येथे पहा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here