Authored by अमर शैला | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 8 Nov 2022, 6:10 am

Mumbai News : अंधेरीतील गोखले पूल जुना झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेवरील प्रवासी संख्येत ११ हजारांनी वाढ झाली आहे. यामुळे करोनानंतर मेट्रो १ मार्गिकेची दैनंदिन प्रवासी संख्या प्रथमच चार लाखांवर पोहोचण्याची चिन्हे आहेत.

 

Mumbai News
मेट्रोच्या प्रवासी संख्येत ११ हजारांनी वाढ; अंधेरीचा गोखले पूल बंद झाल्याचा परिणाम

हायलाइट्स:

  • अंधेरीचा गोखले पूल बंद झाल्याचा परिणाम
  • मेट्रोच्या प्रवासी संख्येत ११ हजारांनी वाढ
  • दैनंदिन प्रवासी चार लाखांवर पोहोचण्याची चिन्हे
मुंबई : अंधेरीतील गोखले पूल जुना झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेवरील प्रवासी संख्येत ११ हजारांनी वाढ झाली आहे. यामुळे करोनानंतर मेट्रो १ मार्गिकेची दैनंदिन प्रवासी संख्या प्रथमच चार लाखांवर पोहोचण्याची चिन्हे आहेत. तसेच गोखले पूल दुरुस्तीकामासाठी पुढील दोन वर्षे बंद राहणार असल्याने यात आणखी वाढीची अपेक्षा मेट्रो १ प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

अंधेरी पूर्वेला पश्चिमेशी व तेथून पुढे वर्सोवा आणि पश्चिम भागाला जोडण्यासाठी गोखले पूल महत्त्वाचा आहे. तो बंद करण्यात आल्याने अंधेरीहून वर्सोवाकडे जाणाऱ्या मेट्रोवरील भार वाढला आहे. सोमवारी संध्याकाळी ५पर्यंत प्रवासी संख्येत ११ हजारांनी वाढ झाली होती. यामध्ये सर्वाधिक प्रवासी वाढ अंधेरी पश्चिमेकडील आझाद नगर मेट्रो स्थानकावर आहे. त्याखालोखाल डी. एन. नगर आणि वर्सोवा मेट्रो स्थानकावरही प्रवाशांची संख्या वाढली आहे. ही वाढ लक्षात घेऊन गरज भासल्यास अतिरिक्त मेट्रो गाड्या सोडण्यात येणार आहे.

सेमी फायनलपूर्वी भारतीय संघासाठी आली गुड न्यूज, पाहा नेमकं आता घडलं तरी काय…
करोनापूर्वी मेट्रो १मधून दरदिवशी ४ लाख ते ४ लाख ५० हजार नागरिक प्रवास करत होते. करोना लॉकडाउनमध्ये मेट्रो सेवा बंद करण्यात आली. बंदकाळानंतर १८ ऑक्टोबर, २०२०पासून पुन्हा मेट्रो धावू लागली. मेट्रो प्रवास पुन्हा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला केवळ १३ हजार प्रवासीच होते. त्यानंतर गेल्या वर्षी फेब्रुवारीत प्रवासी संख्या वाढून १ लाखापर्यंत पोहोचली. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा कडक निर्बंध लागू केल्यामुळे प्रवासी संख्या ५० हजारांहून कमी झाली. त्यानंतर गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने मेट्रोची प्रवासी संख्या करोनानंतर प्रथमच २ लाखांपुढे गेली होती. गेल्या काही महिन्यांत मेट्रो प्रवासी संख्या ३ लाख ५० हजार ते ३ लाख ८० हजार यादरम्यान होती. मात्र आता गोखले पूल बंद केल्याने प्रवासी मेट्रोकडे वळण्याची चिन्हे आहेत.

मोदी सरकार ४ भांडवलदारांसाठी काम करते; राहुल गांधींचा देगलूरमध्ये घणाघाती हल्लाबोल

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here