rohit sharma injured, सेमीफायनलपूर्वी भारतासाठी आली वाईट बातमी; इंग्लंडविरुद्धच्या लढतीआधी रोहित शर्माला दुखापत – bad news for india ahead of the semi-final rohit sharma injured before the match against england
T 20 World Cup : भारताचा सेमी फायनलचा सामना आता गुरुवारी इंग्लंडबरोबर होणार आहे. पण या सामन्यापूर्वी आता भारतीय संघासाठी एक ‘बॅड न्यूज’ आली आहे. भारतीय संघासाठी आता जी बातमी आली आहे त्यामुळे चाहते दुखावले आहेत.
सेमीफायनलपूर्वी भारतासाठी आली वाईट बातमी; इंग्लंडविरुद्धच्या लढतीआधी रोहित शर्माला दुखापत
मेलबर्न : भारताचा सेमी फायनलचा सामना हा गुरुवारी इंग्लंडबरोबर रंगणार आहे. पण या सामन्यापूर्वी आता भारतीय संघासाठी एक ‘बॅड न्यूज’ आलेली आहे. ती म्हणजे सराव करताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाली आहे. इंग्लंडविरोधातल्या सेमी फायनलपूर्वी रोहितला दुखापत झाली आहे. त्यामुळे रोहित आता सेमी फायनलचा सामना खेळणार की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
टी-२० वर्ल्डकपच्या दोन्ही सेमी फायनल्स आता काही तासांवर आल्या आहेत. त्याचदरम्यान ही भारतीय संघाच्या आणि रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी खूप दुख:द बातमी आहे. यामुळे चाहते कमालीचे नाराज झाले आहेत. रोहित शर्मा हा भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज आहे, जर रोहित या सामन्याला मुकला तर भारतीय संघाला खूप जड जाणार आहे. विशेष बाब म्हणजे, भारतीय संघ पहिल्यांदा टी-२० वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. रायगडमध्ये भीषण अपघात: वाळू वाहतूक करणारा डंपर रिक्षावर कोसळला; ३ तरुणींसह रिक्षाचालक ठार