Maharashtra Politics | नुसत्याच नोटीस पाठवून फायदा नाही, अब्दुल सत्तार यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. काल दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांच्याविरोधात प्रचंड आक्रमक झाले होते. यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस नक्की काय मागणी करणार, हे बघावे लागेल.

हायलाइट्स:
- अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना शिवीगाळ केल्याचा विषय बाजूला ठेवा
- पण कुठल्याही महिलेला अशाप्रकारे शिवीगाळ करणे योग्य नाही
- सत्तारांच्या मनातील गोष्टी ओठावर आल्या आहेत
यावेळी आदित्य ठाकरे यांनी आक्रमकपणे अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. अब्दुल सत्तार यांना पदमुक्त करणे गरजेचे आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मला अपेक्षा नाही. तसेच याप्रकरणात राष्ट्रीय महिला आयोग काय कारवाई करणार, हेदेखील पाहावे लागेल. नुसत्याच नोटीस पाठवून फायदा नाही, अब्दुल सत्तार यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. काल दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांच्याविरोधात प्रचंड आक्रमक झाले होते. यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस नक्की काय मागणी करणार, हे बघावे लागेल.
सत्तारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले
अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही तासांपासून महाराष्ट्रात अक्षरश: रान उठवले होते. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी नाहक ओढवून घेतलेल्या या वादामुळे शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच नाचक्की झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अब्दुल सत्तार यांच्यावर प्रचंड संतापले होते. मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना फोन करून त्यांचे कान टोचल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना तातडीने सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची माफी मागण्याचे आदेश दिले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.