भारत वि. इंग्लंड सामन्यात रिचर्ड केटलबोरो अम्पायरिंग करणार नसल्यानं भारतीय क्रिकेट चाहते आनंदात आहेत. कारण गेल्या काही वर्षांमध्ये रिचर्ड केटलबोरो भारतासाठी अनलकी ठरले आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२१, टी-२० विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं. २०१९ च्या विश्वषक स्पर्धेत बाद फेरीत भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान होतं. महेंद्रसिंह धोनी धावबाद झाल्यानं भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. त्या सामन्यात रिचर्ड केटलबोरो पंच होते.
२०१४ टी-२० विश्वचषक, २०१५ एकदिवसीय विश्वचषक, २०१६ टी-२० विश्वचषक, २०१७ चम्पियन्स करंडक स्पर्धेत भारत जेव्हा जेव्हा बाद फेरीत पराभूत झाला, तेव्हा तेव्हा रिचर्ड केटलबोरो पंच होते. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ एकमेव सामना हरला आहे. दक्षिण आफ्रिकेनं गट साखळीत भारताचा पराभव केला. त्यात रिचर्ड केटलबोरो यांनी पंच म्हणून काम पाहिलं.
टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिला सामना न्यूझीलंड वि. पाकिस्तान यांच्यात होईल. ९ नोव्हेंबरला दुपारी दीड वाजता दोन्ही संघ आमनेसामने असतील. तर भारत वि. इंग्लंड सामना १० नोव्हेंबरला दुपारी दीड वाजता ऍडलेडमध्ये होईल.