वाचा:
फोर्ट भागात जीपीओ इमारतीसमोर भानुशाली इमारत आहे. ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतरही काही कुटुंबं इमारतीत राहत होती. या कुटुंबांना भीषण दुर्घटनेचा सामना करावा लागला. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास इमारतीचा मोठा भाग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि त्याखाली अनेक जण दबले गेले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच पालिकेच्या अन्य यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या व मदत आणि शोधकार्य सुरू करण्यात आले. पाठोपाठ एनडीआरएफचे पथकही तिथे पोहचले व बचावकार्य सुरू करण्यात आले.
वाचा:
काल संध्याकाळी सुरू झालेले मदत व बचावकार्य अजूनही सुरूच आहे. इमारतीतील रहिवाशांनी दिलेल्या यादीनुसार एकूण ११ जण बेपत्ता होते. त्यातील सहा जणांचे मृतदेह आधीच मिळाले होते. तर, आज दुपारी पहिल्या मजल्यावरील ढिगाऱ्याखालून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यातील दोन मृतदेह महिलांचे तर एक पुरुषाचा आहे. त्यामुळं मृतांचा आकडा आता ९ झाला आहे. तर, नेहा गुप्ता (वय ४५) व भालचंद्र कांडू हे दोघे जखमी आहेत. यातील नेहा गुप्ता यांची प्रकृती चिंताजनक आहे.
रहिवाशांनी दिलेल्या यादीनुसार सध्या तरी कोणीही बेपत्ता नाही. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून आणखी काही काळ हे बचावकार्य सुरू राहील, असं एनडीआरएफचे आशिष कुमार यांनी सांगितलं.
वाचा:
मृतांची नावे खालीलप्रमाणे:
कुसुम गुप्ता (वय ४५)
ज्योत्स्ना गुप्ता (वय ५०)
पदमलाल गुप्ता (वय ५०)
महिला (ओळख पटलेली नाही)
किरण मिश्रा (वय ३५)
मनीबेन फरिया (वय ६२)
शैलेश कांडू (वय १७)
प्रदीप चौरसिया (वय ३५)
रिकू चौरसिया (वय २५)
आता टेलिग्रामवरही आहे. लेटेस्ट बातम्या आता मोबाइलवरही मिळवा. फॉलो करण्यासाठी
.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times