मुंबई : वातानुकूलित रेल्वे डब्यातील जागेचं आरक्षण केल्यानंतरही रेल्वे प्रवासात एसी बंद असल्याने ग्राहक न्यायालयात धाव घेतलेल्या प्रवाशाला मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी रेल्वेने सदर प्रवाशाला ५० हजार रुपये भरपाई म्हणून द्यावेत, असे आदेश मुंबईतील ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील फोर्ट परिसरात राहणाऱ्या शिवशंकर शुक्ला यांनी जून २०१७ मध्ये अलाहाबाद-मुंबई या प्रवासासाठी दुरांतो एक्स्प्रेसमध्ये प्रथम वर्ग एसीचे आरक्षण केलं होतं. मात्र रेल्वे गाडीत प्रचंड उकाडा असतानाही एसी बंद होता. त्यामुळे शुक्ला आणि इतर सहप्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली. त्यावर गाडी सुरू होताच एसी सुरू होईल, असं रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं. मात्र नंतर गॅस लीक झाल्याचं कारण सांगत संपूर्ण प्रवासात एसी बंदच ठेवण्यात आला.

Video: मराठमोळ्या पेहरावात सुधा मूर्तींनी घेतली संभाजी भिडेची भेट; पाया पडून घेतले आशीर्वाद

या सगळ्या प्रकारानंतर मला प्रचंड मानसिक त्रास झाल्याचं सांगत शिवशंकर शुक्ला यांनी थेट ग्राहक न्यायालयात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर आणि IRCTC यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. अखेर आता याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने आपला निर्णय दिला असून मानसिक त्रासासाठी ३५ हजार रुपये आणि खटल्याच्या खर्चाचे १५ हजार रुपये असे एकूण ५० हजार रुपये रेल्वेने शिवशंकर शुक्ला या प्रवाशाला द्यावेत, अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here