Patil Prashant | Maharashtra Times | Updated: 8 Nov 2022, 12:43 pm
Chandrapur News : चंद्रपूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दोन गटातील जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून शीर धडावेगळे करण्यात आले.

मृतक महेश मेश्राम याची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. तो नुकताच कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता. आरोपी आणि मृतकाचा वाद नेमका कशामुळे झाला याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी संशयाच्या आधारे सध्या २ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.