६० मिनिटांत ६१ महिलांचा ब्रायडल मेकअप…

पुणे : पुण्यातील वृषाली शेडगे या महिलेने अवघ्या ६० मिनिटांच्या कालावधीत ६१ महिलांचा ब्रायडल मेकअप करून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये स्थान मिळवले आहे. शेडगे यांनी यापूर्वी २०१७ मध्ये ‘लीज इन्स्टिट्यूट’ द्वारे आयोजित भारतीय वधूची स्पर्धा जिंकली आहे. मेकअप उद्योगात नेहमीच स्वत:चे नाव कमावण्याची त्यांची इच्छा होती, त्या २०१९ मध्ये हा विक्रम करण्याचा प्रयत्न करत होत्या. परंतु महामारीमुळे ते होऊ शकलं नाही. अण्णा भाऊ साठे सभागृहात बुधवारी त्यांनी एका तासात जास्तीत जास्त वधू मेकअप करण्याचा विक्रम केला. त्यांच्या या विक्रमाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे.
१० वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत…

भारताला जागतिक स्तरावर नेण्याचे शेडगे यांचे ध्येय आहे. त्या म्हणाल्या की आता पाश्चात्य देश आपल्या देशातून काही धडे घेऊ शकतात आणि भारतीय मेकअप तंत्र स्वीकारू शकतात. गेल्या १० वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असल्याने, मोठ्या संस्थांमध्ये जाणे परवडत नसलेल्या वंचित आणि इच्छुक लहान-शहरातील विद्यार्थ्यांमध्ये आपले ज्ञान आणि कौशल्य सामायिक करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्रवास केला आहे.
२००० हून अधिक विद्यार्थ्यांना शिकवले…

गेल्या १० वर्षांत त्यांनी २००० हून अधिक विद्यार्थ्यांना शिकवले आहे. त्यामुळे आज त्यांची ओळख International MAKE-UP Artist म्हणून आहे. लग्नानंतर त्यांना यामध्ये त्यांच्या पतीचीही साथ मिळाली. त्यामुळे हे सगळं शक्य झाल्याचं त्या सांगतात.
२०१२ मध्ये मेक-अपमध्ये अकादमी सुरू केली…

वृषाली शेडगे यांनी CIDESCO (Zurich)ही इंटरनॅशनल डिग्री घेतली असून त्या इंडियन ब्रीयडल मकेअप स्पर्धा (2017)च्या विजेत्या आहेत. त्यांनी बॉडी आणि ब्यूटीमध्ये डिप्लोमा केला आहे. इतकंच नाहीतर तर मेक-अप (इंडोनेशिया) मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रमाणन मिळवलं आहे. त्यांनी अनेक चांगले मेकअप डिप्लोमा पूर्ण केले असून २०१२ मध्ये मेक-अपमध्ये स्वतःची अकादमी सुरू केली.
२५०० हून अधिक आर्टिस्टना शिकवलं…

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेडगे यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये ४६ मेकअप सेमिनार घेतले आहेत. त्यांनी ५०० पेक्षा जास्त मेकअप वर्कशॉप घेतले आहेत. त्यांनी आतापर्यंत २५०० हून अधिक आर्टिस्टना तयार केलं आहे. बऱ्याच गरजू होतकरू आर्टीस्टला फ्रीमध्ये शिकवले आणि त्यांना फ्री प्रॉडक्ट्स दिले आहेत.
महाराष्ट्रात १०० पेक्षा जास्त मेकअप सेमिनार घ्यायचे ध्येय…

आपल्याा करिअरविषयी त्यांना विचारलं असता त्यांना महाराष्ट्रात १०० पेक्षा जास्त मेकअप सेमिनार घ्यायचे आहेत. भारतात वेस्टर्न कला येण्यापेक्षा भारतीय कला वेस्टर्न लोकांनी घ्यावी, शिकावी यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे. गरजू विद्यार्थ्यांना व्यवसायासाठी यातून मदत करणे, Entice Make-up academy ची शाखा महाराष्ट्र भर ऊभी करणे अशी त्यांची पुढची ध्येय आहेत.