सांगली: मिरज ते पंढरपूर मार्गावरील भोसे (ता. मिरज) येथील ४०० वर्षांचा वटवृक्ष वाचवण्यासाठी आता राज्याचे पर्यावरण मंत्री सरसावले आहेत. विविध पक्ष्यांचे आश्रयस्थान आणि परिसरातील ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी नियोजित राष्ट्रीय महामार्गात सुधारणा करावी, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केंद्रीय वाहतूक मंत्री यांना केली आहे. ( writes to )

वाचा:

रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ चे सध्या चौपदरीकरण सुरू आहे. या मार्गावर मिरज ते पंढरपूर दरम्यान भोसे येथे गट नंबर ४३६ मध्ये ४०० वर्षांचा जुना वटवृक्ष आहे. जवळच यल्लम्मा देवीचे पुरातन मंदिरही आहे. मिरजमार्गे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी हा वटवृक्ष निवाऱ्याचे ठिकाण आहे. सर्व पालख्या याच वटवृक्षाच्या छायेखाली थांबतात. मात्र, महामार्गाच्या रुंदीकरणासाठी वटवृक्षावर कुऱ्हाड चालवली जात आहे. याला परिसरातील वृक्षप्रेमींनी विरोध केला असून, वटवृक्षाची कत्तल करण्यापेक्षा त्याच्या बाजूने रस्ता तयार करावा असा आग्रह धरला आहे. यासाठी त्यांनी दोन दिवसांपूर्वीच चिपको आंदोलनही केले होते. याची दखल घेऊन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील वटवृक्ष वाचवण्यासाठी सरसावले आहेत.

वाचा:

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आदित्य ठाकरे यांनी नुकतेच एक पत्र पाठवले. या पत्राद्वारे त्यांनी भोसे येथील विशालकाय वटवृक्ष वाचवण्याची विनंती केली आहे. पत्रात म्हंटले आहे की, ‘रत्नागिरी-कोल्हापूर-सोलापूर-नागपूर या महामार्गाचे काम अतिशय गतीने सुरू असल्याबद्दल आपले आभार. याच मार्गालगत भोसे येथे ४०० वर्षांपूर्वीचा महाकाय वटवृक्ष आहे. दुर्मिळ पक्ष्यांचे आश्रयस्थान आणि त्या परिसरातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या वटवृक्षाचे जतन व्हावे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन वटवृक्ष वाचवावा ही विनंती.’ परिसरातील नागरिकांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत केले असून, कोणत्याही स्थितीत वटवृक्षाची कत्तल होऊ देणार नाही, असा इशारा निसर्गप्रेमी सह्याद्री परिवाराने दिला आहे.

ठेकेदाराकडून वृक्षतोडीची घाई

मिरज ते पंढरपूर मार्गाच्या रुंदीकरणासाठी सध्या रस्त्याकडेच्या झाडांची कत्तल सुरू आहे. किती झाडे तोडली जाणार? झाडे तोडण्याच्या बदल्यात किती झाडे लावली जाणार? याबाबत ठेकेदार काहीच माहिती देत नाही. वटवृक्ष तोडण्याबाबतही त्याच्याकडून घाई सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून उत्तर मिळत नाही, तोपर्यंत वटवृक्षावर कुऱ्हाड चालवू नये, असे आवाहन वृक्षप्रेमींनी केले आहे.

वाचा:

आता टेलिग्रामवरही आहे. लेटेस्ट बातम्या आता मोबाइलवरही मिळवा. फॉलो करण्यासाठी
.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here