नवी दिल्ली: वाढत्या वायू प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरमधील लोक हैराण झाले आहेत. दिल्लीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दिल्ली-नोएडा, गाझियाबादसह एनसीआरमध्ये हवा तर विषारी झालीट आहे. त्याशिवाय दाट धुक्यामुळे दृश्यमानताही इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे की जवळपास उभी असलेली व्यक्तीही स्पष्ट दिसत नाही. सलग चौथ्या दिवशी मंगळवारी सकाळी दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) ‘अत्यंत खराब’ श्रेणीत नोंदवला गेला. इतकेच नाही तर नोएडा, गाझियाबादचा AQI देखील अत्यंत खराब श्रेणीत नोंदवला गेला आहे आणि या भागांच्या दृश्यमानतेत लक्षणीय कमतरता झाली आहे.

दिल्ली-एनसीआरचे लोक मंगळवारी सकाळी जेव्हा झोपेतून उठले तेव्हा आकाशात दाट धुकं पसरलेले होते आणि संपूर्ण एनसीआरवर धुक्याची दाट चादर दिसून आली. सकाळी दृश्यमानता एवढी कमी होती की, रस्त्यावर दिवे लावून वाहनांना अत्यंत कमी वेगाने गाडी चालवावी लागली. कमी दृश्यमानतेमुळे लोकांना जवळच्या गोष्टीही स्पष्टपणे दिसत नव्हत्या. ही स्थिती केवळ दिल्लीतच नाही तर नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद आणि गुरुग्राममध्येही होती. या भागात दिवसाही धुक्याची चादर दिसून येत आहे.

Delhi Air Pollution1

दिल्लीतील परिस्थिती आणखी बिकट, जवळचा व्यक्तीही दिसेना

हेही वाचा –पतीची हत्या, पत्नी तुरुंगात, सहा वर्षांनी तो जिवंत सापडला; प्रकरण सोडवता-सोडवता पोलीस चक्रावले

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजता राजधानीत २४ तासांचा सरासरी AQI ३४८ होता. रविवारी AQI ३३९ होता, जो सोमवारी ३५४ वर पोहोचला. शनिवारी तो ३८१ होता. शून्य आणि ५० मधील AQI ‘चांगले’, ५१ आणि १०० ‘समाधानकारक’, १०१ आणि २०० ‘मध्यम’, २०१ आणि ३०० ‘खराब’, ३०१ आणि ४०० ‘अत्यंत खराब’ मानले जातात. ४०१ आणि ५०० मधील AQI ‘गंभीर’ श्रेणीत येतो.

हेही वाचा –पतीच्या मृत्यूची बातमी कळताच पत्नीनेही सोडले प्राण, विक्रोळीतील मन सुन्न करणारी घटना

दिल्लीत आज हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीतील किमान तापमान १७.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. जे या हंगामातील सरासरीपेक्षा तीन अंशांनी जास्त आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, सोमवारी दिल्लीत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे नोव्हेंबर महिन्यातील २००८ नंतरचे सर्वोच्च तापमान आहे.

विक्रेत्यांच्यासमोर अस्थाव्यस्थ ढीग; कपडे,बॅग, बूट सगळचं आभीत भस्म, मुंबईतील फॅशन स्ट्रीट परिसरात आगीचा भडका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here