covid 19: करोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला मोठं यश मिळालं आहे. काल दिवसभरात देशात करोनाचे ६२५ नवीन रुग्ण आढळून आले. ९ एप्रिल २०२० नंतर प्रथमच देशात २४ तासांत इतक्या कमी रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात देशात करोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मार्च २०२० नंतर प्रथमच करोनामुळे दिवसभरात एकही मृत्यू झालेला नाही.

करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ४ कोटी ४१ लाख १७ हजार ६११ वर पोहोचली आहे. तर करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचं प्रमाण १.१९ टक्के इतकं आहे. देशातील करोना रुग्णांचा आकडा ७ ऑगस्ट २०२० रोजी २० लाखांवर गेला. २३ ऑगस्टला हाच आकडा ३० लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेला. ५ सप्टेंबरला करोना रुग्णांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली. १६ सप्टेंबरला हाच आकडा ५० लाखांचा टप्पा ओलांडला. करोना रुग्णांचा आकडा २८ सप्टेंबरला ६० लाखांच्या पुढे सरकला. ११ ऑक्टोबरला रुग्णसंख्येनं ७० लाखांचा टप्पा ओलांडला. ८० लाख रुग्णसंख्येचा आकडा २९ ऑक्टोबरला ओलांडला गेला. २० नोव्हेंबरला ९० लाख, तर एक कोटीचा आकडा १९ डिसेंबरला ओलांडला गेला.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.