t20 world cup 2022: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा मुकाबला गुरुवारी इंग्लंडशी होणार आहे. दुसऱ्या गटात अव्वल ठरलेल्या भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यास भारत अंतिम फेरी गाठेल. ऍडलेडवर होणाऱ्या सामन्यात टॉस निर्णायक ठरू शकतो.

 

rohit s
ऍडलेड: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा मुकाबला गुरुवारी इंग्लंडशी होणार आहे. दुसऱ्या गटात अव्वल ठरलेल्या भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यास भारत अंतिम फेरी गाठेल. ऍडलेडवर होणाऱ्या सामन्यात टॉस निर्णायक ठरू शकतो. टॉसमुळे सामन्याला कलाटणी मिळू शकते हे आतापर्यंतच्या निकालांवरून दिसून आलं आहे.

साधारणत: कोणताही संघ टॉस जिंकावा यासाठी प्रार्थना करतो. विश्वचषक स्पर्धेसारख्या स्पर्धेतील बाद फेरीच्या सामन्यांत टॉस अतिशय महत्त्वाचा असतो. टॉस जिंकावा यासाठी चाहते प्रार्थना करतात. मात्र ऍडलेडमध्ये इंग्लंडविरुद्ध भारत टॉस हरावा अशी भारतीय चाहत्यांची प्रार्थना असेल. कारण टॉस हरल्यास भारत सामना जिंकू शकतो.

ऍडलेड ओव्हलवर भारतीय संघ १० नोव्हेंबरला इंग्लंडचा सामना करेल. इथे टॉस अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. या विश्वचषक स्पर्धेतील ११ सामने ऍडलेडवर झाले आहेत. इथे टॉस जिंकणारा संघ सामना हरतो. टॉस हरणारा सामना जिंकतो. भारतीय संघ या मैदानात बांगलादेशविरुद्ध खेळला. त्या सामन्यात पावसानं अडथळा आणला होता. पावसाला सुरुवात झाली त्यावेळी बांगलादेशचा संघ आघाडीवर होता. मात्र पावसानंतर चित्र पालटलं आणि भारतानं सामना जिंकला. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसननं टॉस जिंकला होता.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here