सिडनीत राहणाऱ्या पतीने स्वतःच्या हातानेच आपला ४४ वर्षांचा संसार संपवला. त्याने पत्नीचा राहत्या घरातच गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. पत्नी चपलने शारीरिक मारहाण करत चाकूने धमकावत असल्याचा दावा पतीने केला आहे. देशव्यापी कोविड १९ लॉकडाऊन लागू झाल्यानंतर २ मे २०२० रोजी हा प्रकार घडला. एनग्रासिओ सॉन्गकुआन उर्फ फ्रेड (Engracio Songcuan) ६९ वर्षीय पत्नी एर्लिंडाची वुडक्राफ्ट येथील घराच्या गॅरेजमध्ये हत्या केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु आहे. फ्रेड आता ७५ वर्षांचा आहे. दोघांमध्ये पैसे आणि व्यभिचाराच्या संशयातून वारंवार खटके उडत असत.

आपल्या पत्नीने आत्महत्या केली, असा बनाव रचण्यासाठी फ्रेडने तीन खोट्या सुसाईड नोट लिहिल्या. त्यांची मोठी मुलगी कॅथरिनला त्या चिठ्ठ्या सापडल्या. ‘तिचा आवाज बंद करण्याशिवाय माझ्याकडे कुठलाही अन्य पर्याय दिसत नव्हता. शांती आणि थोडं स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टींची मला नितांत आवश्यकता होती.’ असं हत्येच्या दिवशी पोलिसांनी अटक केल्यानंतर फ्रेडने सांगितलं.

२०१८ च्या सुरुवातीपासूनच दोघांमधील कटुता वाढताना दिसली होती. दोघांमधील भांडणं इतकी टोकाला गेली की दोघं वेगवेगळ्या बेडरुममध्ये झोपत होते. २०२० मध्ये फ्रेडने घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरीही केली. मात्र अर्ज दाखल केला नाही.

आईच्या हत्येच्या दोनच दिवस आधी दोघांचं किचनमध्ये कडाक्याचं भांडण झाल्याचं त्यांच्या लेकीने सांगितलं होतं. एका बर्थडे कार्डवरुन दोघांमध्ये वाद झाला आणि आई हातात सुरी घेऊन वडिलांना चपलेने मारत होती, असंही त्यांच्या मुलीने कोर्टात सांगितलं. ती वडिलांचा फोन पाहण्याची मागणी करत होती.

बँक खात्यातून अंदाजे १७ हजार डॉलर गहाळ झाल्याने आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा एर्लिंडाला संशय होता. मात्र राहत्या घरी परस्त्रीची अंतर्वस्त्र सापडल्याने फ्रेडने आपण सहा वर्षांपूर्वी लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा बळावल्यानंतर एका मसाज पार्लरमध्ये गेल्याचं फ्रेडने कबूल केलेलं.

हेही वाचा : नाशिकचं प्रेमी युगुल गोव्याला, खोट्या आयडीवर लॉज बूक, २१ वर्षांच्या तरुणाने प्रेयसीसोबत…
कोणीतरी तिच्या मनात विष कालवल्याने तिच्या मनात माझ्या अनैतिक संबंधांचा किडा वळवळत होता. तिच्या हातात कायम चाकू-सुरे असल्यामुळे एखाद दिवस ती माझा जीव घेईल, अशी भीती मला वाटायची. दोन मेच्या दिवशी ती माझ्या खोलीत शिरली. माझ्यावर टीव्ही रिमोट फेकला. त्यानंतर ५० सेमी लांब वस्तूने वार केला. मी धावत कालच्या मजल्यावर गेलो, तिथून गराजमध्ये पळालो. ती तिथेही माझा पाठलाग करत आली. ती माझ्यावर ओरडत मारहाण करत होती. त्यामुळे मला तिचा आवाज कायमचा बंद करावा लागला, असं फ्रेडने कोर्टात सांगितलं. एक हात तिच्या तोंडावर ठेवून तिचा श्वास थांबेपर्यंत मी तिचा गळा १५ ते २० मिनिटं मुरगळला, असंही त्याने कबूल केलं.

त्यानंतर ही आत्महत्या भासावी असा बनाव फ्रेडने केला. तिचा मृतदेह लेकीला सापडावा, अशी व्यवस्थाही केली. मात्र मुलीला त्यांच्या कचऱ्याच्या डब्यात घटस्फोटाचे फाडलेले कागद सापडले आणि तिला पित्यावर संशय बळावला. फ्रेडने स्वसंरक्षणार्थ किंवा प्रवृत्त झाल्याने हे कृत्य केल्याचे आरोप कोर्टाने फेटाळले.

हेही वाचा : माझ्याकडे बघून सूसू का केलीस? १९ वर्षीय युवकावर अनैसर्गिक अत्याचार, Video ही शूट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here