वाचा:
येत्या २२ जुलै रोजी अजित पवारांचा वाढदिवस आहे. राजकीय नेत्यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून साजरा केला जातो. बॅनर, पोस्टर लावले जातात. त्या माध्यमातून नेत्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न गावोगावचे कार्यकर्ते करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते असलेले अजित पवार हे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांचा वाढदिवस कार्यकर्ते मोठ्या उत्साहात साजरा करतात. यंदा मात्र अजित पवार यांनीच कार्यकर्त्यांना तसं काही न करण्याचं आवाहन केलं आहे.
वाचा:
आपल्या वाढदिवशी उत्साहाच्या भरात कुणीही गर्दी करू नये आणि करोनाविरुद्धच्या लढाईत अडथळा येऊ नये हे लक्षात घेऊन अजित पवारांनी एका मागोमाग एक ट्विट केले आहेत. ‘राज्यावरील करोनाचं संकट व त्या निमित्तानं घ्यावयाच्या खबरदारीची स्थिती लक्षात घेऊन मी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, इतर कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये, कोणतेही जाहीर कार्यक्रम आयोजित करू नयेत. करोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करावं,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
वाचा:
‘राज्याला करोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावं. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक बांधवांनीही वाढदिवसानिमित्त कुठलाही कार्यक्रम आयोजित करू नये. भेटीगाठी टाळाव्यात. त्याऐवजी करोनामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांना मदत करावी. माझ्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसवर, पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या, सहकाऱ्यांच्या, पाठिराख्यांच्या, हितचिंतकांच्या, राज्यातील तमाम जनतेच्या शुभेच्छा माझ्यासाठी निश्चितच खूप मोलाच्या आहेत. या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. कृपया त्या शुभेच्छा ई-मेल, फेसबुक, व्हॉट्स्ॲप, ट्विटर आदी डिजिटल माध्यमांद्वारे पाठवाव्यात,’ असंही त्यांनी पुढं म्हटलं आहे.
आता टेलिग्रामवरही आहे. लेटेस्ट बातम्या आता मोबाइलवरही मिळवा. फॉलो करण्यासाठी
.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times