मुंबई : मुंबईमध्ये सोमवारी रात्रीपासून हवेचा दर्जा खालावल्याची जाणीव मुंबईकरांना झाली. रात्रीच्या वेळी हवेमध्ये धुरके जाणवू लागले. त्यानंतर मंगळवारी दिवसभर हवेचा दर्जा खाली घसरला होता. मंगळवारी ‘सफर’ या हवेची गुणवत्ता नोंदवणाऱ्या प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या नोंदणीमध्ये हवेची गुणवत्ता वाईट स्वरूपाची असल्याचे समोर आले. पुढील दोन दिवस असेच वातावरण असेल, असा अंदाज आहे.

‘सफर’च्या नोंदीनुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक २४५ होता. माझगाव येथे हवेची गुणवत्ता अतिवाईट होती. नवी मुंबईमध्येही हवेची गुणवत्ता अतिवाईट नोंदली गेली. माझगाव येथे पीएम २.५चा निर्देशांक ३००हून अधिक होता, तर पीएम १०चा निर्देशांक मात्र मध्यम श्रेणीतील होता. कुलाबा, वांद्रे-कुर्ला संकुल, चेंबूर, अंधेरी, मालाड या केंद्रांवरही मंगळवारी दिवसभरात हवेची गुणवत्ता वाईट नोंदली गेली. कुलाबा येथेही पीएम २.५ प्रदूषके अधिक होती, तर वांद्रे-कुर्ला संकुल केंद्रावर पीएम २.५ आणि नायट्रोजन डाय ऑक्साइड या दोन्ही प्रदूषकांची श्रेणी वाईट नोंदली गेली.

संजय शिरसाट ठाकरे गटात परतणार, ते अस्वस्थ आहेत हे खात्रीने सांगते | सुषमा अंधारे

अंधेरी तसेच मालाड केंद्रावरही पीएम २.५ची पातळी खालावलेली होती. या केंद्रांवर पीएम १०ची पातळी मध्यम श्रेणीतील नोंदली गेली. मुंबईतील वरळी, भांडुप, बोरिवली या केंद्रांवरील हवेची गुणवत्ता मध्यम स्वरुपाची होती. सध्या हवेचा वेग मंदावलेला आहे. त्यामुळे वातावरणात प्रदूषके साचून राहण्याचे प्रमाण वाढलेले आहे. हवेची ही स्थिती पुढचे दोन दिवस अशीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी आणि गुरुवारीही मुंबईच्या हवेमध्ये प्रदूषण जाणवेल असा अंदाज सफरतर्फे वर्तवण्यात आला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार कुर्ला येथे सोमवार आणि मंगळवार दरम्यान रात्रीच्या वेळी पीएम १० या प्रदूषकाची पातळी अतिवाईट होती. माझगाव येथेही तासांच्या नोंदींमध्ये पीएम २.५ च्या दर्जा रात्रीच्या सुमारास अतिवाईट तर दुपारी धोकादायक झाल्याचेही समोर आले आहे. देवनार येथेही रात्रीच्या कालावधीत काही तास हवेचा दर्जा अतिवाईट नोंदला गेला, तर दिवसभरात दुपारी १२पर्यंत हवेची गुणवत्ता वाईट होती. अंधेरी चकाला येथे पीएम २.५मुळे हवा वाईट आणि अतिवाईट या दरम्यान नोंदली गेली. वांद्रे-कुर्ला संकुल येथेही रात्रीपासून सकाळी नऊपर्यंत हवेची गुणवत्ता अतिवाईट होती. दुपारनंतर हवेची गुणवत्ता किंचित सुधारली.

कोकणावर संकट आले तेव्हा हे बाप बेटे होते कुठे?; रामदास कदम यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here