पुणे : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक डी-१८ शोगन ऑरगॅनिक्स लिमिटेड या केमिकल कंपनीत रिअक्टरमध्ये निर्माण झालेल्या दाबामुळे स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्फोटाची भीषणता एवढी भयानक होती की, कंपनीला लावण्यात आलेले पत्र्याचे तुकडे होऊन ते पुणे – सोलापूर महामार्गावर येऊन पडले होते. या स्फोटात तीन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शोगन ऑरगॅनिक्स लिमिटेड या प्रोप्राजेल क्लोराईडच्या रासायनीक प्रकिया करण्याचे काम केले जाते. मात्र, या प्रक्रियेदरम्यान रिअक्टरमध्ये निर्माण झालेल्या दाबामुळे हा मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटावेळी अधिक कामगार उपस्थित नसल्याची माहिती समोर आली असून मोठी जिवीतहानी टळली आहे.

खोके सरकार म्हटल्यास थेट २५०० कोटी रुपयांचा दावा ठोकणार; घोषणा जिव्हारी लागल्याने एकनाथ शिंदेंचा पक्ष आक्रमक
या स्फोटात प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, उपेंद्र सिसोदिया, हरिकिशन व तिसऱ्या कामगाराचे नाव समजू शकले नाही अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. रिअक्टरमध्ये नेमका दबाव निर्माण होण्याचे कारण अद्याप समोर आले नसून कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला असून काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे अजून किती जीव गमवायचे असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. अशा घटनांमुळे आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

या मंत्र्यांना हाकला, नाहीतर…; उद्धव ठाकरे संतापले; सत्तारांचा इतका आक्रमक समाचार कोणीच घेतला नसेल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here