मुंबई : सध्या देशाच्या विविध भागांमध्ये हवामानाचे वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत. अनेक भागांमध्ये थंडीचा जोर वाढलाय तर काही ठिकाणी अजूनही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच उत्तर भारतातून कोरडे वारे वाहत असल्यामुळे थंडीचा जोर वाढलेला पाहायला मिळतो. उत्तर भारतामध्येही थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

खरंतर, श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळून नैऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे ही थंडी वाढत असल्याचं बोललं जात आहे. इतकंच नाही तर यामुळे देशातल्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. दिल्लीमध्ये प्रदूषणाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. अशा कमाल तापमान ३०°c आणि किमान तापमान १७ अंश सेल्सिअसवर राहण्याची शक्यता आहे. यामुळे दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्येही थंडीचा जोर वाढणार आहे.

Maharashtra Cold Wave : राज्यात थंडीचा तडाखा वाढला, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घट

नऊ ते दहा नोव्हेंबरपर्यंत कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, हरियाणा, गुरुग्राममध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. फरीदाबादमध्येही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तराखंड, हिमाचल प्रदेशातही हलका पाऊस पडू शकतो.

या भागांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र थंडीचा चोर वाढणार आहे. पहाटे थंडी तर दुपारी उन्हाचा चटका बसत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. महाराष्ट्रातही पहाटे थंडी पडल्याचे पाहायला मिळतं. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असलं तरी दुपारी ऊन पडल्यामुळे बदलत्या हवामानाचा अनुभव सर्वजण घेत आहेत. येत्या काही दिवसात थंडी वाढणार असून नागरिकांनी याची आतापासूनच काळजी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

थंडीचा गैरफायदा घेत पहाटे सुरू होता धक्कादायक प्रकार, कार उघडताच पोलीस हादरले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here