ठाणे (दीपक चित्रे) : ठाण्यातील मॉलमधील चित्रपटगृहामध्ये घुसून राष्ट्रवादीकडून बंद पाडण्यात आलेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा मंगळवारी मनसेकडून ठाणे, नवी मुंबईमध्ये मोफत शो आयोजित केला. यामुळे या चित्रपटगृहामध्ये मनसैनिकांनी प्रचंड गर्दी करुन सायंकाळचे तीन शो हाऊसफुल्ल केले.

‘हर हर महादेव’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपटात इतिहासाची मोडतोड झाल्याचा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसने नोंदवला आहे. या चित्रपटास विरोध करण्यासाठी सोमवारी ठाण्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. यावेळी एका चित्रपट रसिकाला मारहाणही करण्यात आली होती. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी मनसेने ‘हर हर महादेव’चा मोफत शो आयोजित करतानाच चित्रपटास पूर्ण पाठिंबा दर्शवला. यावेळी मनसेच्या चित्रपट सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सिनेमागृहात मोठी गर्दी केली होती. चित्रपटगृहामध्ये घुसून प्रेक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार ठाण्यातील प्रेक्षकांना आवडला नसून, या प्रकाराचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील तरुणाई हा चित्रपट पाहण्यासाठी आल्याचा दावा मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव व शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केला.

पाकिस्तानकडून सबका बदला लेगा विल्यमसन; टी-२० वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल आज, जाणून घ्या सर्व अपडेट
मनसेच्या चित्रपट सेनेचे पदाधिकारी अमेय खोपकर, अभिजीत पानसे यांनीही या चित्रपटाच्या शोला उपस्थिती लावली होती. सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या चित्रपटाच्या निमित्ताने जातीय राजकारणाला सुरुवात केल्याचा आरोप मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला. ‘आठ दिवसांपूर्वी चित्रपट प्रदर्शित झाला. पण तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अधिवेशन झाले व त्यानंतर हा विरोध करण्यात आला’, असा आरोप जाधव यांनी केला. या मोफत शोच्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

Mumbai Local Train: मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रेनची वाहतूक अर्धा तास उशीराने, स्थानकांवर गर्दी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here