हे लक्षात ठेवा…
जेव्हा एखाद्या व्यक्तीला पक्षाघाताचा झटका येतो तेव्हा साठ सेकंदांत जवळजवळ मेंदूतील ३२००० पेशी नष्ट होतात. त्यामुळे पक्षाघातादरम्यानचा वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणूनच ‘एफएएसटी’ला खूप महत्त्व आहे.
‘एफएएसटी’ म्हणजे काय?
एफएएसटी (F.A.S.T) हे पक्षाघाताची लक्षणे ओळखण्यात मदत करणारे फेस-चेहरा, आर्म- हात, स्पीच- बोलणे आणि टाइम-वेळ याचे संक्षिप्त रूप आहे.
चेहरा : चेहऱ्याच्या एका बाजूला लकवा मारणे,
हात : एक हात उंचावण्यास त्रास होणे
बोलणे : वाचा पूर्ण जाण्याची लक्षणे
वेळ : वरील लक्षणांपैकी एकही आढळल्यास तातडीने रुग्णालयात नेणे. कोणतीही चिन्हे दिसली तर रुग्णवाहिकेशी संपर्क साधा, जेणेकरून गोल्डन अवरमघ्ये उपचार करणे शक्य होईल तसेच कायमचे अपंगत्व येण्यापासून वाचवता येईल.
बैठ्या जीवनशैलीमुळे हल्ली ४० ते ५५ वयोगटात पक्षाघाताचे प्रमाण वाढते आहे. मोठ्या संख्येने लोक रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलस्टेरॉलची पातळी नियंत्रित न करणे आणि पक्षाघात किंवा हृदयविकाराचा झटका यांसारख्या घातक समस्यांना बळी पडतात. साथीच्या आजारादरम्यान योग्य काळजी न घेतल्याने देखील पक्षाघाताला आमंत्रण मिळू शकते. पक्षाघातामुळे कायमचे अपंगत्व येऊ शकते किंवा मृत्यू ओढवू शकतो. हात कमकुवतपणा, अस्पष्ट बोलणे, अंग अशक्तपणा, चक्कर येणे, डोके हलकेपणा, चालण्यात अडचण, चेहरा सुन्न पडणे आणि शरीराच्या एका बाजूला अर्धांगवायू होणे, ही काही धोक्याची चिन्हे आहेत.
वेळीच निदान आणि आणि त्वरित उपचार यामुळे पक्षाघाताशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.
-डॉ चंद्रनाथ तिवारी