बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात निपाणी जवळका तांडा येथे २२ वर्षीय नवविवाहित तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पांडुरंग राजाभाऊ चव्हाण (वय २२) असं मृत तरुणाचं नाव आहे. पांडुरंग चव्हाण या तरुणाचा विवाह पौळाचीवाडी येथील एका तरुणीसोबत झाला होता. त्यांच्या लग्नाला अवघे २१ दिवस झाले होते. मात्र संसार फुलण्याआधीच पांडुरंगने जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत पांडुरंग चव्हाण याचा गळ्याला खुणा असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे हा घातपात असल्याची शक्यता नातेवाईकांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मुंबईकरांनो, ऑफिसमध्ये आज लेटमार्क लागणार, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

नेमकं काय घडलं?

पांडुरंग चव्हाण आणि त्याची पत्नी हे काल झोपण्यासाठी आपल्या खोलीमध्ये गेले. मात्र काही वेळानंतरच चव्हाण यांची पत्नी दरवाजा उघडून बाहेर धावत आली आणि घरातील व्यक्तींना सांगू लागली की पांडुरंग यांचे पूर्ण शरीर हे थंडगार पडले असून ते काहीही बोलत नाहीत. त्यानंतर घरातील व्यक्तींनी त्या खोलीकडे धाव घेऊन घडलेला प्रकार पाहताच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

ही आरडाओरड ऐकून आजूबाजूच्या गावातील लोक जमा झाले आणि तात्काळ पांडुरंग चव्हाण यांना गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपजिल्हा रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह नेल्यानंतर नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस प्रशासन करत असून नेमकं काय घडलं हे आता पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here