सकाळी नाश्ता करत असताना त्याच्या मोबाईलवर फोन आला आणि तो बोलत घराबाहेर पडला. मात्र, उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्याच्या बहिणीने मोबाइलवरून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, संपर्क साधला गेला नाही. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नाशिकमधील देवळाली कॅम्प-भगूर या रस्त्यावर एक युवक बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन, या युवकास आपल्या वाहनातून लॅम रोडवरील देवळाली छावणी रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी प्रथमोपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला रात्री तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, या घटनेतील मयत गणेश पठाडे याची बहीण प्रज्ञा कांबळे यांनी त्यांच्या नात्यातील एका युवकावर खुनाचा संशय असल्याचे पोलिसांकडे व्यक्त केल आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेशच्या मारेकर्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मयत गणेश पठाडे याच्या पाश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे. गणेश हा मोल-मजुरीचे कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. नाशिकला बहिणीला सासरी सोडवण्यासाठी आला असताना त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात जोरदार चर्चा होऊ लागली असून हत्या झाल्याने देवळाली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.